पान:माझे चिंतन.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ८० माझे चिंतन

दिसत आहेत. शोषणाला तर येथे मर्यादाच नाही. त्यामुळेच वीस वर्षांनंतरही तेथे दलित, शोषित लोकांच्या बंडाळ्या होत आहेत व सरकार त्यांच्या कत्तली करीत आहे. मार्क्सच्या मताने भांडवलशाहीचे मुख्य लक्षण जे खडे लष्कर, पोलीस व तुरुंग ते या दोन्ही देशांत सरकारी सहीशिक्क्यानेच जिवंत ठेवले आहे. तेव्हा हे भांडवली देश आहेत की नाही याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. उलट सरकारी मालकीमुळे तेथल्या भांडवलशाहीला शासकीय भांडवलशाहीचे रूप आलेले आहे. भांडवलशाहीचा हा सर्वोत क्रूर व अमानुष प्रकार होय.

ब्रिटन- अमेरिकेतील वंशद्वेष

 युद्धाचे दुसरे कारण जे वंशद्वेष त्याचा सर्वत्र निषेध होत असला तरी ब्रिटन, अमेरिका यांसारख्या प्रगत देशांतही हा द्वेष वाढीस लागल्याचीच चिन्हे दिसत आहेत. केनेडीबंधू, मार्टिन लूथर किंग यांचे खून त्यापायीच झाले. निग्रो लोकांच्या उठावण्या त्यामुळेच होत आहेत. काही निग्रो तर अमेरिकेच्या फाळणीची मागणी करीत आहेत. ब्रिटननेही हळूहळू गौरेतर लोकांच्या प्रवेशबंदीचे कायदे करून वर्णभेदाच्याच दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेप्रमाणे तेथे निग्रो किंवा तत्सम जमातींची मोठी संख्या नाही म्हणून या प्रश्नाला तेथे अजून तीव्रता आलेली नाही. ती येण्याचा संभव दिसू लागल्यामुळे ब्रिटनने आपली दारे लावून घेण्याचे ठरविलेले दिसते. दक्षिण आफ्रिका, ऱ्होडेशिया येथे तर वंशद्वेष उजळ, सरकारमान्य पद्धतीनेच सुप्रतिष्ठित झालेला आहे. अजून तेथील निग्रो लोक व भोवतालची स्वतंत्र झालेली निग्रो राष्ट्रे पुरेशी समर्थ झालेली नाहीत म्हणून तेथला वैरानी युद्धरूपाने पेट घेत नाही इतकेच. पण पुढील शतकातील जागतिक युद्धाची तयारी तेथे आज चालू आहे, असे आज तरी दिसत आहे.

मुस्लीम राष्ट्रांतील धर्मद्वेष

 धर्मद्वेषासंबंधी वर लिहिलेच आहे. भांडवलशाही किंवा वंशद्वेष यांच्याइतका जागतिक राजकारणात त्याचा प्रभाव नसला तरी अरब, तुर्क, इराणी या मुस्लीम धर्मीय राष्ट्रांत आता जागृती होत आहे. आणि त्या जागृतीबरोबरच त्यांच्यांतील इतर धर्मीयांचा द्वेषही वाढत आहे, हे पाकिस्तानचे भारतावरील आक्रमण,