पान:माझे चिंतन.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युद्ध अटळ आहे काय ? ७७ 

आम्हांला त्यांचा भूप्रदेश हवा आहे. मागे परक्या देशांवर आक्रमण करून तद्देशीयांना दास्यात डांबण्यातच जेते समाधान मानीत. पण पंचवीस-तीस किंवा फार तर शंभर दीडशे वर्षांनी जित लोक संघटित होऊन दास्यशृंखला तोडून जेत्यांना हाकलून देत. त्यामुळे जेत्यांनी ते प्रदेश जिंकताना केलेले बलिदान, ओतलेला पैसा, उभारलेल्या सेना सर्व फुकट जाई. तेव्हा आम्ही जर्मन लोक जिंकलेल्या भूप्रदेशातून मूळच्या लोकांना बॉम्ब, विषधूम, रोगजंतू या अस्त्रांनी जातितः नष्ट करून टाकू. म्हणजे नॉर्डिक वंशाच्या विस्ताराला तो प्रदेश कायमचा मिळेल.' दक्षिण आफ्रिकेतील व अमेरिकेतील काळ्या गोऱ्यांचा वंशद्वेष असाच 'अरावणमरामं वा' या जातीचा आहे. एक वंश आज नष्ट करता आला तर दुसऱ्याला कृतार्थता वाटेल. युद्धे टाळण्याचे ज्यांना प्रयत्न करावयाचे आहेत त्यांनी वंशद्वेषाची विसाव्या शतकातही टिकून राहणारी ही आग हिशेबात घेणे अवश्य आहे.

धर्मभेद

 धर्मभेद हे युद्धाचे कारण मागल्या काळाइतकेच आजही प्रभावी आहे, हिंदु- मुसलमान यांच्यांतील अहिनकुल वैर आजही रतिमात्र कमी झालेले नाही. पाकिस्तान त्यातूनच निर्माण झाले आहे. इजिप्त, इराण, सिरिया इ. मुस्लीम राष्ट्रे या धर्मद्वेषामुळेच भारताविरुद्ध पाकिस्तानची बाजू घेत असतात. हिंदू आणि खिश्चन यांच्या बाबतीत असेच आहे. आज या दोन धर्मीयांची प्रत्यक्ष युद्धे होत नाहीत पण परकी मिशनऱ्यांनी नागा, मिझो या जमातींचे धर्मांतर करून त्यांच्या ठायी भारतीयांबद्दलचा जो द्वेष पसरविला आहे त्यावरून त्यातून युद्ध जरी नाही, तरी लढा चालू झाला आहे. रशिया व चीन या देशांत मुस्लीम अल्पसंख्य असले तरी कोटिसंख्येने निश्चित आहेत. पण तेथील शास्ते शहाणे व जागरूक असल्यामुळे तेथे ख्रिश्चन व मुस्लीम यांच्यात लढे होणे अशक्य आहे. पण पॅन इस्लामिझमसंबंधीची जी भाषणे होतात त्यावरून धर्मद्वेषाची आग विझली आहे किंवा कधी विझेल असे म्हणता येणार नाजी. अरब- इस्रायल युद्धाने याचे प्रत्यंतर नुकतेच आणून दिले आहे. ज्यू व अरब हे मूळचे एकाच म्हणजे सेमेटिक वंशाचे आहेत. पण हिंदू व मुसलमान किंवा जर्मन आणि इंग्रज हे एकवंशीय असूनही आज जसे हाडवैरी झाले आहेत तसेच अरब आणि इस्रायल-ज्यू हेही हाडवैरी झाले आहेत. इस्रायल राष्ट्र भूतलावरून पुसून