पान:माझे चिंतन.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतीय जीवनातील क्रिकेट व हॉकी ३९ 

एकदाही विजय मिळवता आला नाही त्याच्यासाठी आपण जीव टाकतो ! आणि वैयक्तिक प्राविण्याच्या जोडीला सांघिक खेळाला अवश्य त्या गुणांची जोपासना करून, ज्या हॉकीने अखंड दोन तपे सर्व लहानथोर राष्ट्रांचा पराभव करून, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक क्रीडास्पर्धात भारताचे नाव उजळून टाकले आहे, त्याविषयी आपण पूर्णपणे उदासीन आहो ! त्याची आपण पूर्ण उपेक्षा करतो. योगायोगाने का होईना, पण सध्या असे घडते आहे, की आपल्याला क्रिकेटच्या संघात दिसणारे स्वतःचे प्रतिबिंब हॉकीच्या खेळात दिसणाऱ्या प्रतिबिंबापेक्षा जास्त प्रिय, जास्त आकर्षक वाटते !

नोव्हेंबर १९५३