पान:माझे चिंतन.pdf/२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






नरोटीची उपासना






मिर्झा राजे
 औरंगजेबाच्या इस्लामी राज्याची वाढ करण्यासाठी शिवछत्रपतींवर चालून येणारे मिर्झा राजे जयसिंग यांचे नाव इतिहासात प्रसिद्ध आहे. बाराव्या वर्षापासून त्यांनी शिपाईगिरी चालविली होती व मध्य आशियापर्यंत मोहिमा करून श्रेष्ठ सेनापती, कुशल रणपंडित म्हणून अतुल कीर्ती मिळविली होती. पण आपल्या अंगचे हे सर्व संगरनैपुण्य त्यांनी इस्लामी राज्याच्या अभिवृद्ध्यर्थ अर्पण केले होते. आणि असे करण्यात आपण हिंदुधर्माशी काही द्रोह करीत आहो असे त्यांना वाटत नव्हते. दक्षिणेत शिवछत्रपती हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याच्या प्रयत्नात होते. त्यांचे ते प्रयत्न धुळीस मिळविण्याची जबाबदारी मिर्झा राजे यांनी शिरावर घेतली व छत्रपतींना पराभूत करून पारही पाडली. पुढे छत्रपतींनी आग्र्याहून निसटून जाऊन डाव उलटविला ते निराळे. पण हिंदवी स्वराज्य संस्थापनेचे कार्य नेस्तनाबूद करण्याची आपली प्रतिज्ञा मिर्झा राजे यांनी पार पाडली होती. छत्रपती आग्र्याहून सुटून गेल्यावर औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग यांना ठपका दिला. तुम्हीच बापलेक शिवाजीला सामील झाला, असा त्याने बोल लाविला. तेव्हा मुसलमानी तख्ताशी आपण एकनिष्ठ आहो हे सिद्ध करण्यासाठी जयसिंगाने बादशहास लिहिले की, ' आपली परवानगी असेल तर अजूनही काही युक्ती करून मी शिवाजीचा काटा काढून टाकीन. मी माझ्या मुलासाठी शिवाजीच्या मुलीला मागणी घालीन. आम्हा उच्चकुलीन राजपुतांशी संबंध जोडण्याची त्याला फार हौस आहे. तो ही मागणी निश्चित मान्य करील. मग विवाह विधीसाठी आम्ही एकत्र आल्यावर मी त्यास तेथेच छाटून टाकीन