पान:माझे चिंतन.pdf/२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 १२ माझे चिंतन

तत्त्वज्ञान प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथांचा या भूमीवर अविरत वर्षाव करावा. तसे त्यांनी केले तर गेल्या पाचसहाशे वर्षात जे संत होऊन गेले त्यांना निवृत्ती, संसारविन्मुखता, वैयक्तिक धर्म यांचा प्रसार करण्यात जे यश आले तेच यश आपल्याला मिळून संघटना, राष्ट्रनिष्ठा, विज्ञाननिष्ठा ही नव्या धर्माची तत्त्वे समाजातील अगदी खालच्या थरापर्यंत पसरतील व पुनर्घटनेचे कार्य सुकर होईल.

मे १९४६