पान:माझे चिंतन.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युद्ध अटळ आहे काय ? ८९ 

'अटळ आहे' हेच त्याचे उत्तर आहे. पण लोकशाही संघराज्याची कल्पना आतापर्यंतच्या इतर कल्पनांसारखी अगदी भ्रांत नाही. आणि युरोपियन कॉमन मार्केटच्या रूपाने ती काही अंशी तरी व्यवहारात आली आहे. म्हणूनच नवा आशेचा किरण दिसू लागला आहे. ती आशा सफल होणे न होणे मानवाच्या विवेकबुद्धीवर अवलंबून आहे. अमेरिकेतील तेरा संस्थानांनी विवेक केला, आस्ट्रेलियातील घटकांनी केला; तसाच जगातली प्रबळ लोकायत्त राष्ट्रे एखादेवेळी करतीलही. कोणी सांगावे ?

नोव्हेंबर १९६८