पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[८७


मिळेल. रा. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी हें नाटक पाहिल्यावर व वाचल्यावर " The Most successful comedy in The Marathi Dramatical Literature ” असें या नाटकाचें वर्णन मला लिहून पाठविलें. त्यांत मित्रपक्षपाताच्या अतिशयोक्तीचा भाग कांही असला तरी अेकंदरीने त्यांचें वर्णन फारसें चूक नाही असें मला वाटतें. 'फाल्गुनराव किंवा तसबिरीचा घोटाळा' हे नाटक देखील हास्यरसाच्या दृष्टीने फारच चांगलें साधलें आहे; पण त्याला प्रहसनाचें थोडेंसें थिल्लर स्वरूप येतें. पण तें कृष्णार्जुन-युद्धांत येत नाही. हें नाटक माझ्या अितर कोणत्याहि नाटकांपेक्षा मराठी नाटक कंपन्यांना अधिक आवडलें असें दिसतें. कारण संगीत करून द्या अशा मागण्या या नाटकासंबंधानेच अधिक आल्या. 'ललितकलादर्श' नाटक मंडळीला तें देण्यापूर्वी गंधर्व मंडळीने तें मागितलें होतें. तें त्यांना देण्याचें ठरलेंहि होतें. नाटक वाचून घेऊन पात्रांच्या रचनेपर्यंत मजल आली होती. पण मुंबअीची सावकारी व मक्तेदारी या दोन्ही आड आल्याने कंपनीला वचनभंग करावा लागला, व मला स्वतःची निराशा करून घ्यावी लागली. नाट्यकलेच्या दृष्टीने अेक मोठी हानी झाली ती अशी की, रा. राजहंस म्हणजे बालगंधर्व यांनी या नाटकांत नारदाचें काम करावें असें ठरलें होतें; पण अेकजात स्त्रियांच्या भूमिका घेण्याची परंपरा मोडून, पुरुष पार्टीची भूमिकाहि आपण चांगली वठवूं शकतों हैं प्रेक्षकजगाला दाखविण्याची बालगंधर्व यांची संधि हुकली.
 (७४) माझें चवथें नाटक ' अमात्य माधव' हें लॉर्ड लिटन याच्या 'Richlieu' या नाटकावरून सुचलें. आणि मुख्य कथानक व कित्येक प्रवेशांची ठेवणहि त्या नाटकावरून घेतली आहे. पण कार्डिनल रिचलियो या पात्राच्या बरोबर तोडीचें पात्र माधवाचार्याचें घेतल्यामुळे त्या नाटकाचें निवळ रूपांतराचें स्वरूप जाअून असलीचें त्याला स्वरूप आलें आहे. प्रो. चिंतामणराव भानू यांनी या नाटकाचें परीक्षण 'विविधज्ञानविस्तारां'त करून त्याची फारच स्तुती केली आहे. विद्वत् मुगुटमणी ब्रह्मचारी तपस्वी असतां, त्याबरोबरच राज्यस्थापन व राज्यसंरक्षण असल्या जबाबदारीचीं राजकीय कामे करणारा शुद्धचारित्र्याचा माधवाचार्य हा कार्डिनल रिच लियोपेक्षा पुष्कळच श्रेष्ठ ठरतो. कारण रिचलियो हा फक्त नांवाचा ब्रह्मचारी होता. त्याच्या अंगांतला तांबडा झगा, धर्माध्यक्षाची टोपी, व