पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
८८]

[माझा जन्मभरचा


हातांतली माळ यांशिवाय धार्मिकतेचें भांडवल त्याच्याजवळ कांही नव्हतें हें इतिहास-वाचकांना माहीत आहे. आणि नाटक लिहितांना मी अितक्या खोल पाण्यांत शिरलों की, शेवटीं माधवाचार्याच्या खऱ्या वैराग्याचाच गंभीर ठसा वाचकां-प्रेक्षकांच्या मनावर राहतो.
 (७५) चित्ताकर्षक नाटक मंडळीला चवथ्या अेका नाटकाची गरज होती. कारण या चार नाटकांच्या संचावर बाहेर कोणत्याहि गांवीं तिला आपला मुक्काम निभावून नेतां येणार होता. मींहि त्या सुमारास लॉर्ड लिटन याचें हें नाटक वाचीत होतों. तेव्हां रूपांतराकरिता माधवाचार्याची भूमिका सुचली व त्यापुरतें, (मात्र त्या भूमिकेपुरतेंच) तें नाटक यशस्वी झालें. परंतु अैतिहासिक नाटक या दृष्टीनें त्याची योग्यता कांहीच नांही. तोतयाच्या बंडांत मात्र ही दृष्टि फार चांगली साधली आहे. त्याचा अुत्तम निर्विवाद पुरावा म्हणजे कै. वासुदेवशास्त्री यांचा या नाटकाबद्दलचा अभिप्राय असा होता की, " निवळ काल्पनिक पात्रे व प्रसंग सोडून दिल्यास खरोखर अैतिहासिक पात्रांच्या स्वरूपांत व वर्णनांत काडीचीहि चूक झालेली नाहीं. " याचें अेक कारण, पूर्वी सांगितल्याप्रमाणें, मी हें नाटक लिहितांना तोतयासंबंधी मिळेल तितकी सर्व माहिती अितिहासाच्या पुस्तकांवरूनच नव्हे तर अस्सल अैतिहासिक कागदपत्रांवरूनहि मिळविली होती. आणि त्यानंतर अलीकडेहि जे कागदपत्र नवे सापडले आहेत, त्यांनी देखील माझ्या नाटकांतील कल्पनेने बसविलेल्या प्रसंगांचें व भाषणांचें समर्थन होत आहे. पण विजयनगरचा अितिहासच मुळांत पुष्कळसा दंतकथेच्या स्वरूपाचा आहे. यामुळे कोणाच्या अितिहासविषयक अभिरुचीचा अुपमर्द माझ्या अमात्यमाधव नाटकाने होण्याचा फारसा संभव नाही अेवढीच त्यांतल्यात्यांत बरी गोष्ट. कसेंहि असलें तरीं अमात्यमाधव हें माझें सर्वांत नावडतें नाटक आहे. माधवाचार्याच्या कांहीं कांहीं भाषणांशिवाय, व दुसऱ्या अेका पात्राने केलेल्या त्याच्या वर्णनाशिवाय, त्या नाटकांत माझ्या मनाला बरें वाटण्यासारखें फारसें कांही नाही. प्रत्यक्ष प्रयोगांत दोन तीन प्रवेश खटकेदार वठतात; परंतु त्याचें श्रेय मला मुळीच नाही. ते लॉर्ड लिटन याच्या पुस्तकावरून बहुधा जसेच्या तसे घेतलेले आहेत. शिवाय हें नाटक रंगभूमीवर फार दिवस राहिलेंहि नाही. चित्ताकर्षक नाटक मंडळी अितर चार नाटक 7