पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
८६]

[माझा जन्मभरचा


प्रेक्षक हसूं लागले व टाळ्या वाजवूं लागले, म्हणजे एक प्रकारें तोच छंद त्यांना सर्वं नाटकभर लागून राहातो असा माझा अनुभव आहे. कदाचित् असेंहि असेल कीं, पंढरपुराचें वातावरण भजनी असल्यामुळे, तेथील प्रेक्षकांना इतर गावच्या प्रेक्षकांपेक्षा टाळी वाजविण्याची अधिक संवय असेल. पण कसेंहि म्हटलें तरी प्रथम प्रयोगापासून त्या नाटकाची लोकप्रियता सिद्ध झाली, ती पुढेहि सतत कायम राहिली, व नाटक पडलें असें कधी कोठेंच झालें नाही. पण त्यांतहि अेक असा धोका आहे की हें नाटक म्हणजे अेकखांबी बंगल्यासारखें आहे. कारण खरोखरच नारदाचें पात्र यांतून काढून टाकलें म्हणजे नाटकांत कांहीच शिल्लक राहात नाही ! आणि नारदाचें काम करणारा मनुष्य जर ढिला मिळाला, किंवा चतुर नसला, तर मात्र नाटक पडल्याशिवाय राहाणार नाही. पण सुदैवाने 'चित्ताकर्षक' मंडळीच्या हातीं हैं नाटक असता, त्यांतील मुख्य नट नानबा गोखले हा हें काम नाना फडणिसाच्या कामाअितकेंच अुत्तम करी. वास्तविक या नुसत्या नाटकाचें पुस्तक हातांत घेअून सामान्य वाचकाने वाचलें असतां, नारदाच्या भाषणाच्या 'शब्दांत' विलक्षण असें कांहीच त्याला दिसत नाही. शब्द अगदीच साधे आहेत. कोठेहि नारदाला आवाज चढा करून बोलण्याचाहि प्रसंग आला नाही. पण खालच्या अर्धसप्तकांतल्या अर्धसप्तकांतच जरूर तेवढा व योग्य ठिकाणीं आवाज बदलला, योग्य शब्दावर किंचित् अधिक जोर दिला, व किंचित् ढोंगीपणा स्वरांत आणला, म्हणजे तेवढ्याने नारदाचें पात्र यशस्वी होऊं शकतें. सर्व नाटकभर भरपूर काम असतां नारदाचें काम करणाराला आपण दमलों असें मुळीच वाटण्याचें कारण नाही. आणि आरड्याओरड्याचीं भाषणें न करतां, स्वतः न रडतां न हसतां, केवळ साधीं भाषणें करणाऱ्या पात्राने नाटक रंगतें अशीं या नाटकासारखीं अुदाहरणें फार थोडीं सापडतील असें वाटतें. पण त्याचें श्रेय, नाटकांत कथानकाच्या गुणामुळे सहज अुत्पन्न होणान्या गमतीच्या प्रसंगांना द्यावें लागतें. या अवघ्या नाटकांत अेकहि शब्द असा नाही की जो ग्राम्य किंवा थिल्लर किंवा फाजील थट्टेबाज असा म्हणतां येअील. असें असतां विनोद मात्र सर्व नाटकभर खेळत राहातो. पात्रें देव-गंधर्वादिकांचीं असल्यामुळे नाटक प्रहसनाच्या सदराखाली कोणी ढकलील असें वाटत नाही. तर त्याला 'हायक्लास कॉमेडी' असेंच नांव: