पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
६२]

[माझा जन्मभरचा


यांच्या विनोदबुद्धीने कोटीचाच आश्रय केला यांत अस्वाभाविक असें काय आहे!
 "शाब्दिक सहानुभूतीप्रमाणें शाब्दिक कोटीचेंहि महत्त्व फारसें नसलें तरी तिचें अस्तित्व सर्वत्र आढळतें व प्रसंगीं ती अुपकारकहि होते. केळकर यांना शाब्दिक कोट्यांची हौस नाहीं असें नाही. पण विपुलता, समर्पकता, व सरसता या दृष्टींनी त्यांच्या शाब्दिक कोटया कोल्हटकर-गडकऱ्यांच्या मानाने फिक्क्या वाटतात. पण केळकर यांच्या शाब्दिक कोट्यांपैकी कांही अितक्या सफाअीदार व सुंदर असतात की, त्या पाहून डोळयाचें पातें लवतें न लवतें तोंच खेळाडूचा त्रिफळा अुडवून टाकणाऱ्या कुशल गोलंदाजीचीच आठवण व्हावी.
 "केळकर यांनी विनोदासाठी विनोद लिहिला नसला, नवी विनोदृसृष्टि निर्माण केली नसली, तरी मराठी वाङ्मयाला विनोददृष्टि देणान्या आधुनिक लेखकांत त्यांचें स्थान अत्यंत अुच्च आहे. समतोल बुद्धीमुळे अतिशयोक्तीची अतिशयोक्ति करून हास्यरस निर्माण करायला त्यांची विनोदबुद्धि सहसा तयार होत नाही. प्रतिपाद्य विषय सुबोध व मनोरंजक करण्याकरिताच ते बहुधा आपल्या विनोदशक्तीचा अुपयोग करतात. अशा लिखाणांत कोटीसाठी कोटी तरी कोण करीत बसेल ?
 “ प्रत्येक वाङ्मयांत काव्याप्रमाणें विनोदाचे विषयहि बहुधा ठराविक ठशाचे होअून बसतात. तसें झालें की, त्या वाङ्मयाची स्थिति सांठलेल्या पाण्याप्रमाणें होते. त्यांत क्वचित् कमळें फुललीं तरी स्नानाचें सुख कोणालाहि मिळत नाही. वाङ्मयाचा प्रवाह वाहता राहिला तरच त्याचा विस्तार होण्याची शक्यता. मराठींतील विनोदाचा असा विस्तार करण्याचें श्रेय भाषेचे भावी अितिहासकार ज्या निवडक लेखकांना देतील, त्यांत केळकर यांची प्रमुखत्वाने गणना होअील. 'टवाळा आवडे विनोद' ही बहुजनसमाजाची विनोदाची कल्पना बदलण्याला केळकर यांचें लिखाण कांही कमी कारणीभूत झालें नाही. अस्पृश्य मानल्या गेलेल्या विनोदाला त्यांनी राजकारणादि देवमंदिरांचीं द्वारें अुघडीं करून दिलीं. त्यांच्या विनाेदगर्भ वाङ्मयाच्या अभ्यासकांतूनच भावी पिढींतील लघुनिबंधकार निर्माण