पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[६१


भोक्ते, केळकर कोटीचें भक्त व अच्युतराव कोल्हटकर सुलभ विनोदाचे पुरस्कर्ते असें ढोबळ वर्गीकरण केलें असतां फारशी चूक होणार नाही. परांजपे यांचें लिहिणें अुन्हासारखे ! सावलींतल्या वाचकाला त्याच्याकडे पाहून आनंद होअील; पण तें प्रत्यक्ष अंगावर घेण्याची वेळ आली तर तो छत्री हुडकायला लागल्याशिवाय रहाणार नाही. केळकर यांचें लिहिणें म्हणजे स्वच्छ चांदणें ! चोराच्या मनाशिवाय त्याचा चटका सहसा कुणाला बसायचा नाही. अच्युतरावांच्या लिखाणांत बहुधा संध्यारंगांचें संमेलनच आढळतें. विनोदी पद्धतीचा अवलंब करून वाचकांचीं मनें अंकित करणाऱ्या या तीन वाङ्मयसेनानींचीं निशाणें अेखाद्या व्यंग्यचित्रकाराच्या हातांत पडलीं, तर तो त्यांच्यावर फार सुंदर चित्रें काढील.
 "शब्द, कल्पना, परिस्थिति, प्रसंग व स्वभाव हे विनोदाचे पंचप्राण होत. यांतील येक प्राण भाषेच्या शरिरांत असला तरी विनोदाचें अस्तित्व वाचकाला पटतें. प्रासंगिक, स्वभावजन्य, व परिस्थितिमूलक विनोदाला कथा व नाटकें यांच्याअितकें निबंधांचें क्षेत्र अनुकूल नाही. तथापि 'कृष्णार्जुनयुद्ध' व 'वीरविडंबन' यांतील वातावरण, 'तोतयाच्या बंडा'तील चवथ्या अंकाचा चवथा प्रवेश, आणि 'माझी आगगाडी कशी चुकली ? ' ही गोष्ट केळकर यांच्या या प्रकारच्या विनोदाची अुत्कृष्ट अुदाहरणें होत. परिस्थितिमूलक विनोद 'विलायतेच्या बातमीपत्रा'प्रमाणे त्यांच्या निबंधलेखनांतहि क्वचित् दृग्गोचर होतो. ओहेन्री अगर पी. जे. वुडहाअूस यांचें 'विनोदाकरिता विनोद' हें तत्त्व केळकर यांनी ललित लेखनांतसुद्धा कधीहि अंगीकारिलेलें दिसत नाही. त्याचा स्वाभाविक परिणाम त्यांच्या निबंधांतील विनोद मुख्यतः कल्पनाप्रधान होण्यांत झाला. विनोद म्हणजे गारगोटीवर गारगोटी घासून अुत्पन्न होणारा अग्नि होय. तो उत्पन्न होतांना मौज वाटली, वाऱ्याच्या लहरीवर त्याचें आयुष्य अवलंबून नसलें, तरी त्याचें दर्शन होअीपर्यंत केवढी तपश्चर्या करावी लागते ! अुलट कोटी म्हणजे आगपेटींतील काडी ! ओढली काडी अन् शिलगाविली विडी ! अग्निदेवता क्षणार्धांत प्रसन्न ! पण वाऱ्याने ती मध्येच विझली तर पुनः ओढायची मात्र सोय नाही. अर्थात् वर्तमानपत्रांत गंभीर विषयाच्या विवेचनांत विनोद फुलवित बसण्याला सवड मिळत नसल्यामुळे, केळकर