पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[ ६३


व्हावयाचे आहेत. पहाटे पूर्वेकडे दिसणाऱ्या शुक्राचें स्वयंभू तेज मोहक असतें हें तर खरेंच; पण रम्य अुषःकालाचा दूत या दृष्टीनेहि त्याच्याकडे आपण कौतुकाने पाहत नाही काय ?"
 (४८) माझ्या या वरील सर्व हकीकतींत, किंवा माझ्या अुदाहरणाने तरुण पिढीच्या लेखकांना नक्की काय बोध घेतां येण्यासारखा आहे हें मला सांगतां येणार नाही. पण कदाचित् बोध घ्यावयाचा तर अितकाच की, 'लिहिण्याची हौस बाळगून मनुष्य अुद्योगशीलपणाने लिहीत राहिला, तर कोणाहि माणसाच्या हातून वाडमय या सदराखाली घालण्यासारखे लेखन होअूं शकेल.' ही हौस कांही अंशीं अुपजत असते हें मी प्रारंभींच सांगितलें आहे. परंतु त्या हौसेचा विकास दोन कारणांनी होअूं शकताे. अेक कारण म्हणजे 'वाङमय ही अेक कलानिर्मित वस्तु आहे' अशी भावना मनुष्याची असली पाहिजे. म्हणजे सुंदर चित्र, सुंदर अिमारत, सुंदर अभिनय, सुंदर कलाकुसरीचें काम, अित्यादिकांकडे पाहण्याची मनुष्याची जी दृष्टि तीच वाङ्मय - म्हणजे गद्य, पद्य, काव्य-यांच्या संबंधानेहि त्याची असली पाहिजे. पण कलेविषयी अभिरुचि ही अुपजत असेल तरच तिचा विकास अभ्यासाने होअूं शकेल. अुलट चित्र, गायन, अभिनय अित्यादि गोष्टींत ज्यांचें मन रमत नाही, व ज्यांना त्याविषयी अभिरुचि नाही, असे पुष्कळ लोक जसे आपण पाहातों त्याचप्रमाणें वाङ्मयांतील सौंदर्यप्रतीति होण्याचें अिन्द्रियच ज्यांना नाही असेहि लोक अनेक आढळतात. अशा कोटींतील मनुष्य फारसें चांगले वाङमय लिहूं शकणार नाही. शब्दलालित्य, हृदयंगम सुश्लिष्ट अर्थ, व भाषेंतील नृत्य, हीं पाहिल्याबरोवर त्यांत कांही विशेष आहे असें ज्याला वाटेल, त्यालाच वाङमय लिहिण्यांत आनंद वाटेल. चितारी जसा आपण काढलेलें चित्र पुनः पुनः आनंदाने पाहून त्यांत रमतो, तशाच प्रकारची सहृदयता वाङमय-लेखकाला पाहिजे. आणि तशी असेल तर आपण लिहिलेलीं पुस्तकेंहि फिरून चाळून वाचण्याची त्याला अिच्छा झाल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याहि लहान सुंदर मुलाचें दर्शन हें आनंददायकच. पण तें मूल स्वतःचें असलें तर त्यांत आनंदाची भरच पडेल नव्हे काय ? स्वतःचें वाङ्मय मधून मधून वाचून पाहण्यांत, स्वतःच्या मुलाला अपत्यप्रेमाने मधून मधून कुरवाळण्यापेक्षा अधिक अहंकारबुद्धि आहे, असें