पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
६०]

[माझा जन्मभरचा


वाङ्मयालाहि केळकर विनोदाची जोड देअूं शकतात. पण अस्तराचें कापड कितीहि तलम ( जाड ? ) असलें तरी त्याचें अस्तित्व कोट वरवर पहाणारांना जसें कळत नाही, त्याप्रमाणें 'टिळक-चरित्र' अगर 'मराठे व अिंग्रज' हीं पुस्तकें वाचणारांना केळकर यांच्या नाजुक विनोदाची कल्पना येणें शक्य नाही.
 "केळकर यांचें बहुतेक निबंधलेखन केसरीसाठीच झालें. राष्ट्रीय जागृतीच्या ध्रुवताऱ्यावर नजर ठेवून, दर आठवडयाला अुपस्थित होणाऱ्या नव्या नव्या विषयांच्या किनाऱ्याने त्यांनी वर्षांनुवर्षें आपली निबंधनौका चालविली. हें नौकानयन, प्रशांत सरोवरांतील स्वच्छंद नौकाविहारापेक्षा तत्त्वतःच भिन्न असल्यामळे, त्यांच्या निबंधांत आत्मभावना, कल्पनास्वातंत्र्य, व विनोदविलास यांना पूर्ण अवसर मिळाला नाही यांत नवल कसलें ? सभेंतील भाषण कितीहि सहजसुंदर असलें तरी खेळीमेळीच्या संवादाचें स्वरूप त्याला कुठून येणार ? निरीक्षणसूक्ष्मता, विनोदप्रवणता, व भाषाप्रभुत्व या केळकर यांच्या वाङमयगुणांच्या संगमांतून गार्डिनर, लिंड, चेस्टरटन, मिल्ने या लेखकांच्या लिखाणासारखे लघुनिबंध निर्माण होणें अशक्य होतें असें नाही. पण सहजसुंदर भावनिबंध लिहावयाला लागणारें विषय कल्पना व वेळ यांचें स्वातंत्र्य वर्तमानपत्राच्या लेखकाला सहसा मिळत नाही. चित्रकार सैनिक झाला की त्याच्या हाताला रणांगणावरील भव्य देखाव्याचें चित्र रेखाटण्याअैवजी तलवारीचे घाव घालण्यांतच दंग व्हावें लागतें.
 " भावनिबंधासारखें कलात्मक लेखन केळकर यांच्या हातून झालें नसलें, तरी त्यांच्या निबंधांनी मराठी वृत्तपत्रांना अेक निराळें वळण लावलें असें म्हणण्यास हरकत नाही. वृत्तपत्राच्या संपादकाला मतप्रसार केला पाहिजे हें तर खरेंच. पण मतप्रसाराचें कडू चाटण विनोदाच्या मधांत मिसळून दिलें तर रोगी तें हसतमुखाने घेतो, हें तत्त्व पुरेपूर ओळखून तें अमलांत आणण्याची पराकाष्ठा करणारे संपादक तीनच-'काळ'कर्ते परांजपे, 'केसरी' कार केळकर, व 'संदेश' स्थापक कोल्हटकर. आगरकर यांच्या लेखनांत प्रासंगिक विनोद असला तरी टिळकांप्रमाणें त्यांच्या लेखनाचाहि ओज हाच आत्मा आहे. परांजपे-केळकर-कोल्हटकर या त्रयींत परांजपे अपरोधाचे