पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[५९


तरी त्याचा जसा अुपयोग नाही, त्याप्रमाणें बहिःसृष्टि व अंतःसृष्टि यांतील सौंदर्याचें संवर्धन करणारी सुसंबद्धता, अगर विनोदविलासाला पोषक असा विसंगतपणा, सूक्ष्मतेने जाणण्याची शक्ति नैसर्गिकच म्हटली पाहिजे. तसें नसतें तर कालिदासाच्या काव्यरसांत बुडून कोरडे राहणारे, अगर बोलण्याखाण्याखेरीज ओठांना विभक्त होअूं न देणारे, हरीचे लाल जगांत दिसलेच नसते !
 “ झाडावर कलम करावें त्याप्रमाणें नैसर्गिक काव्यविनोदशक्तीवर वाचन, निरीक्षण, परिस्थिति व लेखकाचे स्वभावगुण यांचा संमिश्र परिणाम होतो. केळकर यांच्या विनोदाचा या दृष्टीने विचार करूं लागलें की, प्रख्यात विनोदलेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्याशीं कॉलेजमध्ये असतांनाच झालेला त्यांचा स्नेह, वर्तमानपत्राच्या धंद्यांत पडल्यामुळे त्यांच्या वाचनाला आणि अनुभवांना आलेली विलक्षण विविधता, वर्तमानपत्री लेखकाला आपलें लिखाण अळणी वाटूं नये म्हणून त्यांत मीठमसाला घालण्याची नेहमी वाटणारी आवश्यकता, अित्यादि गोष्टी सहज सुचतात.
 “ सूक्ष्म टीकाबुद्धीच्या पायावर विनोदाचें मंदिर बहुशः अुभारलें जातें. यामुळे टीकाकारांच्या स्वभावभेदांप्रमाणे त्यांच्या विनोदाचेंहि स्वरूप भिन्न होत असतें. टीकाकाराला 'नावडतीचें मीठ अळणी' लागत असलें की, विनोदांत त्याने अतिशयोक्तीचा आश्रय केलाच म्हणून समजावें. राजकीय व सामाजिक प्रश्न केवळ भावनांवर अवलंबून ठेवणारा टीकाकार विनोदी पद्धतीने लिहूं लागला की, अुपरोध, अुपहास, वक्रोक्ति व व्याजोक्ति ह्या अस्त्रांचा तो पदोपदीं अुपयोग करूं लागतो. टीकाकाराच्या स्वभावाचा अुच्छृंखलपणा त्याच्या विनोदांत प्रतिबिंबित झाल्याचीं अुदाहरणेंहि विपुल सापडतील. केळकर यांचा विनोद बहुधा नेमस्त असतो. याचें कारण त्यांचीं टीकाबुद्धि जितकी मार्मिक तितकीच सात्त्विक आहे हें होय. चिकित्सा आणि सहानुभूति या सवतीसवती त्यांच्या लिखाणांत बहिणीबहिणीप्रमाणें वागत असल्याचें आढळून येतें.
 निबंध-चरित्र-इतिहासादि वाङ्मय, ललितलेखणीने लिहिलें तरी, अेकंदरीत विचारप्रधानच. कोटाला लावलेल्या अस्तराप्रमाणें अशा प्रकारच्या