पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[ ५३


मयुराला जर गायन असतें - सौन्दर्याला जर स्वारस्य असतें - द्रव्याला जर अयाचित्व असतें - वैभवाला जर विवेचकत्व असतें - मनुष्याला जर अमरत्व असतें - अमरांना जर मानव्य असतें - शौर्याला जर शहाणपण असतें - शहाणपणाला जर यश असतें - सत्याला जर सामर्थ्य असतें - आणि सामर्थ्याला जर विश्वप्रेम असतें, तर ह्या जगांत कोणत्याहि तत्त्वनिष्ठेचे पूर्णावतारच आपणास दिसले असते ! पण तें नाही, म्हणूनच भावनाशीलांच्या ठायीं बुद्धीमत्तेचा अभाव आणि बुद्धीमन्तांच्या ठायीं भावनाशीलतेचा अभाव राहून, कल्पनाजन्य कोटि किंवा विनोद ह्यांना निरालम्ब चिदाकाशांत निष्प्रयोजन लोम्बकळत बसल्याचे देखावे नजरेस येतात.
 " श्रीपाद कृष्ण आणि नरसोपंत ह्या दोघांचे असेंच झालेलें आहे !त्यांच्या कोट्या किंवा त्यांचा विनोद ह्यांना भावनाशीलत्वाची आर्द्र भूमिका न मिळाल्यामुळे मसालेवाल्याच्या दुकानाप्रमाणें कल्पनांच्या स्वतंत्र बरण्या भरून ठेवलेल्या त्यांच्याजवळ दिसून येतात. पण असे वाटतें की, हा चमचमीत मसाला जर भावनांच्या चमचमीत पक्वान्नांत पडला असता, तर केवढा चमत्कार झाला असता-केवढा लाभ झाला असता ! पण भावनेच्या अभावामुळे आज त्या पक्वान्नांच्याअैवजी " पोहे " मात्र मिळालेले आहेत !

* * *

 "तात्यासाहेब केळकरांच्या बुद्धिमत्तेसम्बन्धाने ' चाबुकस्वार 'मध्यच अनेक वेळा लिहिण्याचा सम्बन्ध आलेला असल्यामुळे त्याविषयी पुनरावृत्ति करण्याची जरुरी नाही. बुद्धीची कुशाग्रता, व्यापकता, सुपूर्तता व चपलता ह्या चारहि गुणांनी त्यांची तुलना कै. महादेव गोविंद रानडे ह्यांच्याशींच करावी लागते. रानडे यांच्या वेळेपासून अितका बुद्धिमान् पुरुष महाराष्ट्रांत झालाच नाही म्हटलें तरी चालेल ! अनेक प्रसंगी कै. लो. टिळकांपेक्षा केळकरांनी सरस बुद्धिमत्ता दाखविलेली आहे ! व्यासंगांत तर ते कोणापेक्षाहि खात्रीने सरस आहेत. [वरील सर्व परिच्छेद ' संदेशी अतिशयोक्तीचा अेक मासलेवाअीक नमुना' असें म्हणतां येअील ! ]
 " ह्याच्या अुलट श्री. तात्यासाहेब कोल्हटकर यांच्याकडे पाहिले म्हणजे सेण्ट हेलेना बेटांतील तुरुंगवासांत अेखाद्या खडकावर शन्यदष्टीने बसलेल्या