पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
५४]

[माझा जन्मभरचा


नेपोलियन बोनापार्टाच्या चित्राची आठवण होते ! त्याचें राज्य गेलेलें आहे, त्याचें वैभव गेलेलें आहे, पंचवीस वर्षांपूर्वी असलेला त्याचा दरारा गेलेला आहे-आणि आता मूकभाषेंत समुद्राच्या लाटांना आपले मनोगत सांगत तो अेकान्तवासांत बसलेला आहे !

* * *

 “ केळकर यांचें आयुष्य यशस्वी दिसतें-श्रीपाद कृष्ण ह्यांच्या आयुष्या- वर Failure (निष्फळ) असा अेक मोठा फकार किंवा मोठा नकार दिसूं लागतो ! आणि ह्याचें कारण काय तर श्रीपाद कृष्ण यांनी चालू जगावर आपली Hold (पकड ) ठेवली नाही ! नरसोपन्त यांनी ह्याच्या अुलट वर्तन ठेवलें ! ते चालू जगांत राहिले-चालू जगांत पोहले - चालू जगाशीं लढले व चालू जगांत मिसळले ! त्यांच्या ढकलबाज स्वभावामुळे प्रत्येक परिस्थितींतून ते सहीसलामत बाहेर पडले ! त्यांना सातव्या मजल्यावर कोंडलें तरी ते पहिल्या मजल्यावरून बाहेर पडले, व पहिल्या मजल्यावर कोंडले तरी तळघरांतून निसटले ! चालू जगाशीं संबंध आल्यामुळे त्यांची बुद्धि अत्यंत कुशाग्र राहिली ! बुद्धिमत्तेंत त्यांचा " नंबर " पहिला लागला !

 रा. माडखोलकर हीच तुलना खालील शब्दांत करतात--

 "कोल्हटकर यांच्याअितकाच तात्यासाहेबांच्याहि सहवासाचा परिणाम माझ्या वाङ्मय-जीवनावर झाला आहे; व त्या दृष्टीने तेसुद्धा मला गुरुस्थानींच आहेत म्हटलें तरी चालेल. त्यांच्याजवळ मी पांच महिने होतों. या अवधींत जन्मभर पुरेल अितकें लेखनकलेचें शिक्षण त्यांनी मला कळत न कळत दिलें आहे. किंबहुना त्यांचा सहवास हेंच मुळीं अेक प्रकारचें शिक्षण असतें. बकुळीच्या वृक्षाखाली बसणाऱ्या मनुष्याला जसा छायेबरोबर परिमळाचाहि लाभ घडतो तसा त्यांच्या सहवासांत राहणान्या मनुष्याला ज्ञानाबरोबर वाङ्मयाच्याहि अुपभोगाचा आनंद लाभतो. त्यांच्या बुद्धीला अविषय नाही, सहानुभूतीला मर्यादा नाहीत, आणि अुद्योगाला खंड नाही. त्यांच्या अेका मित्राने त्यांना अेकदा असें गमतीने म्हटलें होतें की, "दिवसाच्या प्रत्येक बदलत्या तासागणिक आपण निरनिराळ्या व्यक्तींशीं