पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
५२]

[माझा जन्मभरचा


तोंपर्यंत ते खुलेपणाने बोलतील. पण जास्त माणसें जमावयाला लागलीं की, तात्यासाहेबांच्या तोंडाला कुलूप बसलेंच. तात्यासाहेबांच्या ह्या संकोचीपणाचें अनेक वेळ सभाभीरुत्वांत रूपान्तर झालेलें आहे ! ते जेव्हा सभेंत बोलतात तेव्हा फारच चांगली भाषणें करतात; पण ते सभेंत बोलावयाला येतातच कशाला ? येतच नाहीत! त्यांना संकोच वाटतो! ते " अपसेट" होतात !

* * *

 "साहित्यसभा ही अेक शकुन्तला आहे अशी जर कल्पना केली, तर तात्यासाहेब केळकर व तात्यासाहेब कोल्हटकर हे शकुन्तलेच्या बरोबर दुष्यन्त राजाच्या राजवाड्यांत गलेले दोन ऋषिकुमार आहेत असें म्हणावयाला कांही हरकत नाही ! ह्यांपकी अेकाला सभा आणि थाट आणि गर्दी म्हणजे अगदी कंटाळा - दुसन्याला त्याची अतिशय हौस ! त्याला अुलट हाच आनन्द की, शकुन्तलेला पोंचविण्याच्या डेप्युटेशनवर आपण आलों हें सर्व लोकांना समजावें; आणि दुष्यन्त राजाशीं शेकहॅण्ड करावयाला आपल्याला मिळालें ह्याच्या तारा चोहोकडे जाव्यात !

* * *

 " श्री. नरसिंह चिंतामण केळकर हे श्रीपाद कृष्ण यांचीच व्यावहारिक आवृत्ति होत ! श्रीपाद कृष्ण यांनी संसार विसरूनहि आपला सर्व जन्म वाङ्मयास वाहिल्यामुळे वाङ्मयांतील अत्युच्च प्रदेशांना ते केव्हाना केव्हा तरी स्पर्श करूं शकले ! केळकर यांना तसें करावयाला सवड सापडली नाही ! कल्पनेच्या प्रांतांत ते Wit पर्यंत - फुलपांखरी कोट्यांपर्यंत - अुड्डान करूं शकले. पण सृष्टीच्या निगुढ प्रान्तांमधून 'ह्युमर'च्या थंडगार वाऱ्यांत राजहंसीय अुड्डानें करावयाला राजकारण व वर्तमानपत्रें ह्यांच्या जंजाळा-मुळे त्यांना वेळच सापडला नाही !

* * *

 " आणि म्हणूनच श्री. केळकर ह्यांच्याजवळ Logic ( तर्कशक्ति ) आहे, पण Initiative ( चैतन्यशक्ति ) नाही, असा अनुभव येतो. खरोखर तात्यासाहेब कोल्हटकर यांना जर Heart ( सहसंवेदन) असतें - केळकर यांना जर Initiative (चैतन्य) असतें - सुवर्णाला जर सुगन्धीत्व असतें -