पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
[५० ]

[माझा जन्मभरचा


प्रमाणें विषयाचें निरीक्षण करतील; तर पंत स्विफ्टप्रमाणें चिकित्सेच्या चाकूने त्याचे वाभाडे काढून सत्त्वपरीक्षण करतील. केळकरांच्या सर्वसंग्राहक न्यायालयांत गेलेला अपराधी हसतमुखाने परत जातो. पंतांच्या विरोधाच्या आणि अुपहासाच्या कात्रींत सांपडलेल्या वंदिजनाची अेका डोळ्यांत आसू आणि दुसऱ्या डोळ्यांत हसूं अशी अवस्था होते. तात्या कल्पनेचे धागे जमवून त्याचा गोफ विणतात. पंत कल्पनेचें सूत सापडल्यावर सुताने स्वर्गाला जातात. तात्यांचे विचार समतोल, तर पंतांचे विनतोल. पंतांच्या गुलगुलीत लेखनशैलींत मांजरीचीं नखें लपलेली असतात, तर तात्यांनी, प्रो. पोतदारांच्या म्हणण्याप्रमाणें, केसरीच्या खडतर नखाग्रांना कलेचीं कांकणें चढविलेलीं दिसतात. "
 त्याचप्रमाणें मी व श्री. कृ. कोल्हटकर यांची तुलना अ. ब. कोल्हटकर व माडखोलकर यांनी केली आहे. तिचे कांही अुतारे याखाली देतों-
 " श्री. कृ. कोल्हटकर हे झाले अेक तात्यासाहेब. आता दुसरे तात्यासाहेब म्हणज श्री. नरसिंह चिन्तामण अूर्फ तात्यासाहेब केळकर. ह्यांची गोष्ट ह्याच्या अगदी अुलट आहे. ते आधुनिकांतले आधुनिक आहेत. त्यांच्यात जुनेंपानें असें कांहीच नाही. व्यासंगाच्या अभावामुळे श्री. गंगाधरराव देशपांडे जितके मागे पडले, किंवा व्यासंगाच्या अेकदेशीयत्वामुळे श्री. शिवरामपन्त परांजपे जितके मागे पडले, तितकेहि रा. रा. केळकर मागे पडलेले नाहीत! ते अगदी आधुनिकांतले आधुनिक आहेत " मॉडर्ना "तले " मॉडर्न " आहेत !
 "ह्याचें अेक कारण त्यांची चौकसबुद्धि व दुसरें कारण त्यांचा वर्त-मानपत्राचा व्यवसाय ! चौकसवृद्धि नसली, तर वर्तमानपत्राचा व्यवसाय असूनहि खाडिलकरांसारखीं माणसें जुनीपुराणीं होअूं शकतात, आणि वर्तमानपत्रासारखा व्यवसाय किंवा राजकारणाची रोजची अुठाठेव नसली, तर चिंतामणराव वैद्यांसारख्या चौकस माणसावरदेखील जुनेपणाची हिरवी छाया पडावयाला लागते! पण तात्यासाहेब केळकरांना दोनहि आहेत ! त्यांच्याजवळ राजकारणाचा रोजचा प्रपंचहि आहे व चौकस बुद्धीहि आहे-