पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[ ४९


तमासगीर मंडळी तुणतुणें खेंचून तिसऱ्या सप्तकांत सूर खेंचून गात व साथ करीत आहेत; कडकडीत डफावर डाव्या हाताची टिचकी व अुजव्या हाताची थाप मारून त्यांचा पुढारी अेकाहून अेक सरस असे पोवाडे आठआठवून म्हणत आहे; आणि सर्व श्रोतेमंडळी तल्लीन होअून तटस्थ झाली आहे.
 " या चित्रणांत डफावर थाप पडते; पण डफ कडाडत नाहीं. ठराविक मर्यादेवर तात्यांची लेखणी थांबते; पंत त्या मर्यादेच्या पलीकडे भरारी मारतात. पंतांची शैली श्रद्धा अुत्पन्न करते. त्यामुळे आपणास प्रस्थानत्रयीची अेकवाक्यता पटून, जुनी पुराणांतरीची गोष्ट नवीन रूपांत सापडते. मदनाचें दहन झाल्यावर पुनर्जन्म पूर्वजन्म यांबद्दल जिज्ञासा अुत्पन्न होअून, आपलें लक्ष नव्या सृष्टींतील शब्दांच्या वाढीचा अितिहास आणि त्यामधील कारस्थानें यांकडे जातें.
 " तात्यांचे लेखन अफाट ! सर्व विषयांत लेखणी चालविण्याचा त्यांना हव्यास. त्यांच्या ग्रंथांतील अुतारे काढून अेक वाचनीय ग्रंथ होअील. विषय आत्मसात् करण्याकरिता तात्या ग्रंथ लिहितात. तो विषय त्यांना कळतो; पण खोल दृष्टीच्या वाचकांच्या मनांत भरत नाही त्यामुळे त्यांचें कांही लिखाण कांहीं वाचकांना खर्ड्यासारखें भासतें. पण पंतांचें बहुतेक लिखाण कित्येकांना कित्त्यासारखें भासतें. दोघांच्या भाषेत खळखळ नाही. दोघेहि शब्दांच्या कह्यांत जात नाहीत. तात्यांची भाषा अर्थवती, तर पंतांची अर्थवती असूनहि नादवती. पाठ करण्यासारखे अुतारे पंतवाङमयांत जास्त. तात्यांची शैली वर्तमानपत्री आहे. पंतांची ओघवती लेखनशैली वर्तमानकाळाचे दरवाजे खुले करून, वाचकाला भव्य भविष्याकडे नेते. तात्यांच्या लेखणीचें टोंक अेकसारख्या लेखनाने झिजल्यामुळे गुळगुळीत झालें आहे. पंतांची लेखणी अुसंत मिळतांच स्फूर्तीच्या वालुकापत्रावर घासून अणकुचीदार बनते !
 " अॅडिसन आणि स्विफ्ट यांच्या रचनेची धाटणी अनुक्रमे तात्या व पंत यांच्या लिखाणांत दिसून येते. पंतांजवळ स्विफ्टजवळ नसलेली काव्याची देणगी होती. अॅडिसन तात्यांप्रमाणें राजकारणी नव्हता. केळकर अॅडिसन - मा. ज. अु. ४