पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
४८ ]

[माझा जन्मभरचा


आणि व्याजोक्ति अशा टोंकांनी त्यांची लेखणी कुरकुरूं लागेल. ती कालकन्या त्या शनिवारवाड्याला म्हणेल-
 'हे शनिवारवाड्या, तूं शनीप्रमाणे मराठ्यांच्या राशीला लागलास वास्तविक श्रीवर्धनाच्या धैर्यमेरूंना अंकावर खेळविण्याचें भाग्य तुला लाभलें होतें. ...' भावनेची शाअी सुटून लेखणी पल्लवित झाल्यावर, पंत शनिवारवाड्याला डिवचून म्हणतील- 'जुनाट पुरुषा, फुकट तुझा जन्म ! भेद आपापसांत पाडूं नये, परकीयांत पाडावा, हें राजनीतीचें साधें तत्त्वदेखील तुला समजत नाही, तेव्हा तुला काय म्हणावें ! डोळे मिटल्यावर तूं मला दिसूं लागतोस. आणि तुझ्यावर शिबंदीचे लोक गर्दीगर्दीने चालले आहेत, चौघडे झडत आहेत, भगवीं आणि जरिपटक्याची निशाणें जिकडे तिकडे फडकत आहेत, कालभगिनी महांकाळीच्या सरबत्त्या होत आहेत, भालदार चोपदार ललकारत आहेत, मंत्री आणि प्रधान मनसुबे करीत आहेत, सैन्यें लढत आहेत, आणि राजे विजयश्री मिळवीत आहेत, असे अपूर्व समारंभ जिकडे-तिकडे दृग्गोचर होअूं लागतात!'
 " पंतांचा भाषाविलास संस्कृताभिमुख, तर तात्यांची भाषा महाराष्ट्रीय वळणाची. दोघांचें अिंग्रजी सारखेंच असलें, तरी अिंग्रजीच्या प्रकृतीचा परिणाम त्यांच्या शैलीवर झाला आहे. तात्यांच्या शब्दांची नाणीं परिचयाचीं, पण अुपयोगामुळे किंचित् घासलेलीं. पंतांचीं नाणी पिवळींधमक आणि कलदार. पंतांचा खजिना नेहमी भरलेला. कोणत्याहि राष्ट्रीय दामाजीवर संकट आलें की, पंतांच्या कल्पनेचा विठोबा सैरावरा धावूं लागतो. तात्यांची लेखणी तोल संभाळून विचार करूं लागते. दामाजी दरवडेखोर आहे काय ? बादशहांची परवानगी न घेतां कोठारें मोकळीं केलीं हा त्याचा लहान कां होअीना पण अपराधच नव्हे काय ? असे विचार तिच्यापुढे अुद्भवतात.
 " दोघांनाहि शब्दचित्रें रेखाटतां येतात. तात्यांचें शाहिराचें चित्रण पाहा - 'बुदलीने ओतल्या जाणाऱ्या तेलाने पेटणारे हिलाल पाजळत आहेत; रंगीबेरंगी कपडे घातलेले अर्धअुघडे लोक गोळा झाले आहेत; पायांत तोडा, डोक्यावर कंगणीदार पगडी व त्यांत तुरा खोवलेली अशी अर्धगोंधळी अर्ध-