पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[ ४७


वाहणा-या लेखनगंगेंत वाचक वाहत जातो; केळकरांचें चौरस लिखाण जीवनाभोवती गुरफटलेले ज्ञानाचे कण प्रत्यही टिपून घेत असतें, पंतांचें लिखाण ठरीव पद्धतीचें पण खोलींत जास्त; तात्यांचें व्यापक पण खोलींत कमी. दोघांच्याहि लेखांचें घनपरिमाण (व्हॉल्यूम) मात्र प्राय: सारखेंच ! पंत वेळेलाच लिहीत; तात्या अवेळींसुद्धा हुकमी व चांगलें लिहितात. पंतांच्या लिखाणांत स्पष्टोक्तीचा अभाव, तर तात्यांचें लिखाण प्रासादिक. पंतांची भाषा बुरखा घेतलेल्या काश्मिरी युवतीप्रमाणें ! शरिराला त्वचा त्याप्रमाणें लेखणीला भाषा ! तात्या अर्थ व्यक्त करण्याकरिता लेखन करतात; पंत कांही वेळीं अर्थ गुप्त ठेवण्याकरिता लेखणी सरसावीत. तात्यांची भाषा देवदर्शनाला निघालेल्या प्रौढ गंभीर महाराष्ट्रीय स्त्रीप्रमाणें आहे.
 " तात्या आधी लेखक आणि नंतर वक्ते; पंत आधी वक्ते आणि नंतर लेखक. तात्यांच्या वक्तृत्वांत ग्रंथकाराचा संयम, तर पंतांच्या ग्रंथांत वक्तृत्वाचा ओघ. पंतांचीं शैली प्रदीर्घ आणि पल्लेदार; तर तात्यांची आटोपशीर आणि सुटसुटीत; पंतांच्या गद्यांतहि काव्याचा विलास तर तात्यांच्या काव्योपाहारांतहि प्रसंगी गद्याचा साधपणा व तार्किकपणा ! मुक्तेश्वराप्रमाणें पंतांची भाषा जोमदार आणि मर्मभेदक आहे; अर्थांच्या स्वरूपाप्रमाणें ती आकार धारण करते. तात्यांची भाषा श्रीधराच्या भाषेृप्रमाणें बहुजनसमाजाला सहज कळेल अशी आहे.

 " केळकरांचें शनवारवाड्याचा जीर्णोद्धार करणारें भरदार वाक्य पाहा -
 " अठराव्या शतकाच्या विशींत बांधलेल्या, अेकोणिसाव्या शतकाच्या विशींत नाश पावलेल्या व विसाव्या शतकाच्या विशींत पाये अुकरून काढलेल्या या वाड्याला अेकविसाव्या शतकाच्या विशींत काय दिसणार आहे, तें परमेश्वराला माहीत !"
 " हीच कल्पना पंत कशी नटवतील बरें ? प्रतिभेच्या पंखांवर अुड्डाण करून त्यांची तंद्री लागेल. नंतर विकट हास्य करून छझी स्वराने, वक्रोक्ति