पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
४६]

[माझा जन्मभरचा


यापुढे लेख लिहिणार नाही अशी प्रतिज्ञा पूर्वीं आपण अेक वेळ केली होतीना आणि येथे तर जो लेख नांवावर लिहिलात तो मामुली आहे, आणि नांव न देतां जो अग्रलेख ' केसरी'त लिहिलात त्याचीच मजा विशेष आहे. भीति अेकच वाटते की, माझें अनुमान चुकलें तर मग कसें ? मी हास्यास्पद ठरेन. माझा हा अुपद्व्याप ठरेल. तरी पत्राचें अुत्तर पाठवावें. लेख आपला ठरला तर मात्र मी अभिनंदन कोणाचें करावें याचा प्रश्न पडेल. आपल्या दुर्दम लेखनस्फूर्तीचें ? की तीच स्फूर्ति अुत्पन्न करणाऱ्या महर्षि कर्वे यांच्या ध्येयनिष्ठ कर्मयोगी जीवनाचें? असो. माझें अभिनंदन कोणासहि पोंचलें तरी तें सारखेंच. कारण दोघांचें अेक अेक कार्य तसेंच अुच्च प्रकारचें झालें आहे. "
 (४५) सुमारें तीस वर्षेंपर्यंत शिवरामपंत परांजपे, श्री. कृ. कोल्हटकर व स्वतः मी असे तिघे समकालीन साहित्यिक आपापल्या वाङ्मय -कार्याने लोकांच्या दृष्टीपुढे वावरत होतों. यामुळे आम्हा ओकमेकांची तुलना मार्मिक प्रेक्षकाला सहजच सुचे. म्हणून ती कोणी कशी केली याचे नमुने याखाली देतों. प्रथम परांजपे व मी यांची तुलना पाहा-
 श्री. ग. त्र्यं. बापट, वी. अे., भावे स्कूल पुणें, हे लिहितात-
 " तात्या राजकीय प्रबंधांच्या पंख्यालाहि कोरीव आणि कातीव कलाकुसर करून वाङ्मयाची झालर लावतात, तर पंत आपल्या 'दगडी कोळशा 'सारख्या रुक्ष विषयाला किंवा शकुंतलेवरच्या ललितलेखालासुद्धा राजकारणाच्या पोलादी चौकटींत बसवतात. ललित वाङ्मयांत, नाटकांत, आणि कादंबन्यांत - ज्यांनी राज्यपत्राचा आचार संभाळावयाचा तें केळकर लघुकथेंतील तंत्राचा विचार करण्यांत दंग पाहून टिळकांच्या राजकीय परंपरेच्या कित्येक अभिमान्यांना विषाद वाटतो! पंतांनी साधेल त्या प्रसंगाने लोकांना स्वातंत्र्याचे घुटके दिले. केवळ लालित्याकरिता म्हणून पंतांनी फारसें लेखन केलें नाही.
 " राजकारणानंतर या दोन ग्रंथकारांच्या लेखनशैलीवर शोधकिरणांचा प्रकाश पाडून पाहूं. अेका निबंधनिष्णाताने वाङ्मयाचे ' स्फूर्तिलेखन ' आणि 'ज्ञानलेखन' असे दोन भाग कल्पिले आहेत. शिवरामपंतांच्या दुथडी