पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[ ४५


प्रत्यंतर मला नुकतेंच परवा आलें. प्रो. कर्वे यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या वेळीं ' केसरी'त मीहि अेखादा लेख लिहीन असें आगाअू प्रसिद्ध झालें होतें. त्याप्रमाणें अेक आठवणवजा लेख मी माझ्या नांवावर दिला. पण संपादकांनी मला अग्रलेख लिहिण्याबद्दल सांगितलें म्हणून तोहि मी लिहिला. अेकाच अंकांत माझा अेक लेख अेका नांवाने व दुसरा लेख बिननांवाने येअील अशी कोणाची अपेक्षा सहजच असूं शकणार नाही. परंतु कांहीनी तो अग्रलेख माझा म्हणून ओळखला व मला म्हणूं लागले, तुम्ही नांव छपविलें तरी आम्ही हेरलें. वास्तविक मला छपवाछपवी करण्यासारखें त्यांत कांही नव्हतें. पण मुंबअीचे अेक स्नेही रा. काशिनाथपंत धारप, अॅडव्होकेट व लॉ कॉलेजचे प्रोफेसर यांनी मला खालीलप्रमाणें पत्र लिहिलें ---  " प्रश्न आजच्या ' केसरी'तील अग्रलेखाबद्दल आहे. तो आपण स्वतः लिहिला असला पाहिजे असें वाटतें. पुरावा लेखांतर्गतच आहे. तो म्हणजे लेखनशैली व विचारपद्धति. समर्पक दृष्टान्त देअून अगदी सोप्या शब्दांत अुच्च तत्त्वांचें सूक्ष्म व मार्मिक विवेचन करण्याची आपली लेखनशैली अितर कोणा मराठी लेखकास फारशी साधली नाही. या आपल्या गुणाने आपलें म्हणणें वाचकांच्या बुद्धीला सहज पटतें. शिवाय सर्व लेखनावर जो अेक विनोदाचा अुजळा हळुवार हाताने दिलेला असतो त्याने मनाला आल्हाद होतो. मन व बुद्धि या दोघांचें रंजन अेकसमयावच्छेदाने होत असतांना सद्भावनांनाहि स्फूर्ति मिळत जाते. आपल्या लेखनांत जे अनेक गुण आहेत त्यांत मी वर लिहिलेला गुण फार अुत्कटत्वाने दिसतो. ' केसरी'च्या आजच्या अग्रलेखांत मला हा गुण फार दिसला; शिवाय भाषेची विशिष्ट धाटणी तर आहेच. तर मग माझें अनुमान खरें आहे काय ? जर असेल, तर मला आपलें हार्दिक अभिनंदन करावयाचें आहे. पण तें आपला हा लेख चांगला म्हणून नव्हे हो ! कारण आपले पुष्कळच लेख तसे असतात. मग म्हणाल, अभिनंदन कशाबद्दल ? तर आपल्या प्रतिज्ञाभंगाबद्दल ! प्रतिज्ञाभंगाचा आरोप केला म्हणून रागवाल व अनौचित्याबद्दल हसालहि. पण तसें करण्याचें कारणच नाही. प्रतिज्ञाभंगाचा आरोप खरा आहे, व कित्येक वेळा प्रतिज्ञाभंगाबद्दल अभिनंदन करणें अुचित व आवश्यक ठरतें. स्वतःचें नाव घातल्याशिवाय ' केसरीं 'त'