पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
४४]

[माझा जन्मभरचा


वाअिल्डचें येक वाक्य मला फार आवडतें व मी नेहमी त्याचा उपयोग करीत असतों. तें म्हणजे " Saints have a past and sinners have a future.” याचें पद्यात्मक भाषांतर करावयाचें तर तें असें होअूं शकेल-
  साधू होतसे दुश्चित्त । स्मरुनि आपुलें पूर्ववृत्त
  पापी आस धरुनी मनीं । म्हणे साधू होअिन अजुनी
 (४३) वाङमयसेवेसंबंधानेहि हाच फरक आहे. म्हणजे मनुष्य आज जो विवेचक पद्धतीने लेख लिहितो तो अुद्या भावनाप्रधान पद्धतीने लिहूं शकेल, लिहिण्याचे विषय बदलील, गद्याअैवजीं पद्य लिहूं लागेल, निबंधाची त्याची गोडी जाअून त्याला ललित वाङमय लिहिण्याची गोडी लागेल. तथापि त्याची भाषापद्धति म्हणून जी आहे तींत सहसा फार, म्हणजे ओळख बुजण्याअितका, फरक व्हावयाचा नाही. प्रयत्न करून भाषापद्धति बदलणारे लेखक माझ्या पाहण्यांत फारसे आले नाहीत. हट्टाला पेटून, किंवा मौजेचा प्रकार म्हणून, किंवा विनोदबुद्धीने, किंवा केवळ चातुर्यप्रदर्शन म्हणून, अेखादा लेखक अितर कोणत्याहि लेखकाचें हुबेहूब अनुकरण करून, किंवा विडंबन म्हणून, अेखादा लेख लिहील. पण तितकाच. स्वतःकरिता म्हणून लिहावयास बसला म्हणजे तो आपल्याच घटीव वळणावर जावयाचा. तळहातावरच्या रेघा बदलण्याअितकीच जवळ जवळ कठिण गोष्ट हातांतील लेखणीने लिहिल्या जाणाऱ्या रेघांतील वैशिष्ट्याची आहे. त्याप्रमाणें माझ्या लेखनपद्धतींत - भाषापद्धतींत - आज चाळीस वर्षांत फारसा फरक पडला नाही असें मला वाटतें. १८९२ सालीं टिळक-आगरकर यांच्यांतील वादासंबंधाने ' ज्ञानप्रकाशा 'ला मी लिहिलेलें पत्र, व टिळकचरित्रांत १९२८ सालीं तत्सदृश विषयावर मी केलेली चर्चा, यांची पद्धति जवळ जवळ अेकच म्हणून ओळखण्यासारखी आहे.
 (४४) ' केसरी'मध्ये मी अनेक वर्षें सतत लिहीत गेल्याने अनेक वाचकांना माझें लिहिणें अितकें परिचयाचें होऊन बसलें की, अेखाद्या लेखावर माझें नांव नसलें तरी लिहिण्याच्या ढबीवरून, म्हणजे गुणांप्रमाणें दोषावरून, ते तो लेख माझा म्हणून बिनचूक ओळखूं शकतात. अितर पुष्कळांविषयींहि असेंच होत असेल असें. मला वाटतें. या गोष्टीचें अेक