पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[४३


व म्हणून पुष्कळ लोक ही दगदग न करतां सामान्य वचनांची पेरणी करून वाचकांत भोळेपणा अुत्पन्न करतात. केळकर यांनी या कालांत जर कांही केलें असेल तर तें हें की, हा वैचारिक भोळसरपणा अगदी घालवून त्याच्या जागीं हिशेबीपणा आणला. ज्याप्रमाणें माणसाच्या जीवितांत, त्याप्रमाणें वर्तमानपत्राच्या जीवितांतहि मतप्रवाहास अनुसरून चढअुतार हे अवश्यच आहेत; आणि म्हणून ते तसे झाले. तरी आपली विचारनिष्ठा लोपू देअून पत्राची भरभराट मात्र जिवंत ठेवण्याची आशा धरणें हें त्यांनी गौणच मानलें. पुढारीपणा आणि संपादकत्व हीं दोनहि टिळकांच्या अंगीं अेकवटलीं होतीं. पण आपण मुख्यतः संपादक आहोंत, पुढारीपण प्रसंगप्राप्त म्हणून आलें तर करावयाचें, ही जाणीव मात्र केळकर ह्यांच्या धोरणांत पहिल्यापासून शेवटपर्यंत दिसते. म्हणून अुत्पन्न झालेल्या प्रसंगांत वर्तमानपत्राचीं म्हणून जीं कर्तव्ये ती करण्यांत आपलें सर्व सामर्थ्य ते वेंचीत; त्यामुळे प्रायः अडचणीचा असा कोणताहि प्रसंग प्राप्त झाला, तर आपलें संपादकाचें कर्तव्य, केसरीच्या धोरणास अनुसरून पुरेपूर करण्याच्या कामीं ते सदैव तत्पर असत."
 (४२) माझ्या वाङ्मय - सेवेसंबंधाने मुख्य गोष्ट ही की, मी ही सेवा करण्याकरिता कोणापासून फारसें कांही घेतलें नाहीं, व तसेंच कोणाला फारसें कांही दिलेंहि नाही. पण हें मी भाषापद्धतीपुरतेंच म्हणतों. विचारांसंबंधाने म्हणत नाही. लेखकाचें व्यक्तित्व त्याच्या भाषापद्धतीवरून जसें कळून येतें, तसें त्याच्या विचारसरणीवरून कळून येत नाही. चेहऱ्याची ठेवण, बोलण्याचालण्याची ढब, आवाज यांवरून अेक मनुष्य दुसऱ्यापासून जितका वेगळा होअून ओळखला जातो, तितका कदाचित् त्याच्या स्वभावगुणावरून किंवा चारित्र्यावरूनहि ओळखला जात नाही. कारण पहिल्या प्रकारचीं लक्षणें कधींहि बदलूं शकत नाहीत. जन्मभर तीं तशींच राहतात. पण स्वभावगुण व त्यामुळे चारित्र्य हीं वेळोवेळीं बदलूं शकतात. तिरळ्या डोळ्याचा मनुष्य जन्मभर तिरळाच राहील. आणि घोगन्या आवाजाचा मनुष्य शस्त्रक्रियेनेहि गोड गळ्याचा होअील असें वाटत नाही. पण स्वभावगुणांत चांगल्याचा वाअीट किंवा वाअिटाचा चांगला होअूं शकतो. चारित्र्य ही गोष्ट देखील क्वचित् परिवर्तनशील आहे. ऑस्कर