पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[४१


व्यक्त करण्यास मराठी भाषा केळकरांनी समर्थ केली. त्यांनी किती तरी नवे शब्दपर्याय व रचनाविशेष प्रसृत केले. या रचनाविशेषांवर "केळकरी वळण" म्हणून शिक्का देतां येअील. या विशेषांचा अभ्यास करणारास आतापर्यंत केलेलें तुलनात्मक व संशोधनात्मक विवेचन अुपयोगी पडेल अशी आशा आहे."
 (४०) केतकरांनी ही तुलना करण्यापूर्वी बारा वर्षें टिळक निर्वतले होते. यामुळे टिळकांचें लिहिणें १९२० पर्यंतचें, व तुलना करितांना केतकरांच्या डोळ्यापुढे असलेलें माझें लिहिणें १९३२ पर्यंतचें होतें हें लक्षांत घेतलें पाहिजे. या मधल्या बारा वर्षांत माझ्या लेखांना थोडें निराळें वळण लागलें होतें. कारण १९२०-२१ पासून, टिळकांच्या अभावीं, आमच्या टिळक पक्षातर्फे करण्याच्या अवश्य त्या सर्व गोष्टींचा भार मजवर पडला होता. त्यामध्यें प्रतिपक्षाशीं झगडा, भांडण, स्वपक्षसमर्थन, पक्षोपन्यास, व गांधीविरोधी मतांच्या पाठीमागे असणारें तत्त्वज्ञान अित्यादि गोष्टी येत. यामुळे १९२० पूर्वीच्या माझ्या लेखांत जो शांतपणा, थंडपणा, संयम, विवेक दिसून येतो तो त्यानंतरच्या लेखांत सुटत चालला होता. मी पूर्वी टिळकपक्षाचा अखबारनवीस किंवा रिपोर्टर होतों. तो आता त्या पक्षाच्या आघाडीचा शिपाअी झालों. १९२० नंतरच्या माझ्या वर्तमानपत्री भाषेंत साधेपणा, सोपेपणा व ठसठशीतपणा अधिक येअूं लागला. १८९८ - १९०१ मधल्या केसरींतील माझ्या लेखांची भाषा, १९१० ते १९२० मधल्या केसरींतील माझ्या लेखांची भाषा, व १९२० नंतरची भाषा यांत पुष्कळच फरक पडला आहे. पूर्वी पंडितानें पंडिताकरिता लिहावें असें मी लिहीं; तर त्यानंतर बाजारांतल्या गर्दींतला अेक म्हणून बाजारी गर्दीकरिता लिहावें, असें स्वरूप येअूं लागलें. म्हणूनहि १९२० नंतरच मी केसरींत ललित वाङ्मयाकडे अधिक वळलों. यापूर्वी माझी सगळीं नाटकें लिहून झालीं होतीं; पण ललित वाङमय व वर्तमानपत्री वाङमय यांचा मेळ मी १९२० नंतरच घालूं लागलों. पुढे पुढे तर, कित्येकांच्या मतें, ललित वाङमयानें किंबहुना ललित 'पद्धतीने केसरी' 'बाटविण्या'चें पाप करूं लागलों !
 (४१) १९२० नंतरच्या माझ्या या अशा वर्तमानपत्री लेखनाविषयी 'केसरीप्रबोध' ग्रंथांतील प्रो. माटे यांचा अेक अुतारा देतों तो असा --