पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
४०]

[माझा जन्मभरचा


काम सुरू होअून, शेवटीं पेंड पोचत पोचत झाडापर्यंत आला; व झाडानें जेव्हा कावळ्यास हुसकून लावण्याचें कबूल केलें तेव्हा कावळयाचा निरुपाय होअून अर्जदार चिमणीस न्याय मिळून तिचा मोती तिला परत मिळाला ! याच गोष्टीच्या दुसऱ्या अेका आवृत्तींत, सोट्यानेहि नाकबूल केल्यामुळे, चिमणीस तो जाळून टाकण्यास अग्नीकडे, अग्नि विझविण्यास समुद्राकडे, समुद्र पिअून टाकण्यास हत्तीकडे, व हत्तीच्या कानांत शिरण्यास मुंगीकडे, जाअून दाद मागावी लागली. परंतु मुंगीहि नाकबूल झाली, तेव्हा चिमणीनें आपलें छोटेखानी विश्वरूप दाखवून " तुला खाअून टाकतें " म्हणून आपली चोंच उघडली ! तेव्हा मुंगी कबूल होअून अुलट पेंड पोंचत पोंचत, शेवटीं चिमणीस न्याय मिळाला. या व अशा प्रकारच्या मुलांच्या गोष्टींत नेहमीं बरेंच शहाणपण सांठविलेलें असतें; व विनोदशील पण मार्मिक अशा मनुष्यास अशा गोष्टींचा अुपयोग मोठमोठे राजकीय प्रश्न सोडविण्यासहि होण्यासारखा आहे.
 "अेकंदर गोष्टीची चटकदार वर्णनशैली व शेवटी " विनोदशील व मार्मिक” मनुष्याचा अुल्लेख यांवरून हा लेख तात्यासाहेबांचा आहे यांत शंका अुरत नाहीं.
 "मार्मिकपणा, गमतीच्या अुपमा व खुसखुशीत भाषा या कामांत केळकरांची सर टिळकांना यावयाची नाही. नेहमी जरुरीपुरतें व तोडून मर्यादित करून केळकर हें विधान करतात. म्हणून वादांत दुसऱ्या बाजूला त्यांना धरणें कठिण जातें. कारण आक्षेप आल्यास प्रत्येक विधानाला त्यांनी अपवादात्मक पळवाट ठेवलेली असते.
 "चढाअीचा हल्ला व प्रेरक विधानें या बाबतींत टिळकांचे लेख ठणठणीत असतात. मात्र त्यांत भाषेची कुसर कमी. केळकरांच्या लेखांत वस्तुस्थितीचें मर्मभेदक विश्लेषण व सूचनेच्या स्वरूपांत प्रेरणा असते. केळकर हे टिळकांचे चेले म्हणून मानले गेले असले, तरी त्यांचें भाषा- वैशिष्ट्य स्वयंभू आहे. आणि त्या भाषेचें सौष्ठव, खुसखुशीतपणा, अखंड आकर्षण, अित्यादि बाबतींत केळकरांनी अितकी प्रगति केली की, त्यांच्या भाषेपुढे टिळकांची भाषा जुनाट व बोजड वाटते. सूक्ष्म विचार बोलून