पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[ ३९


शकेल. हें तें वाक्य वाचा : " कायदे कौन्सिलपुढे आणलेलें बिल म्हणजे तो कांही ' रामाचा बाण' नव्हे किंवा ' वासवी' शक्ति नव्हे, की अेकदा हातांतून सुटली म्हणजे मग परत यावयाचीच नाही. हीं बिलें म्हणजे मांजराच्या नखासारखीं वाटेल तेव्हा पुढे काढतां येतात व वाटेल तेव्हा मागे घेतां येतात.
 " टिळकांच्या आक्रमणशक्ति लिखाणांत त्यांचा रोख प्रतिपक्षावर असतो व स्वपक्षांतील भेदाच्या खांचाखोंचा दर्शविण्याच्या भानगडींत ते पडत नाहीत. अुलट स्वपक्षासंबंधीहि केळकरांचें लिहिणें धारवाडी कांट्यांत तोलून नेमकें व यथास्वरूप केलेलें असतें.
 " टिळकांच्या लेखसंग्रहाच्या दुसन्या भागांत अेक केळकरांचा अत्यंत अुत्कृष्ट लेख टिळकांच्या नांवावर छापला आहे. तो लेख म्हणजे " वेडरबर्न साहेबांचा ताजा निरोप" हा होय. (पृ. ५५२) या लेखांत कावळ्या चिमणीची लहान मुलांची गोष्ट अितक्या सुंदर रीतीने सांगितलेली आहे की, टिळकांच्या हातून ती अशी कधीच आली नसती. ती केळकरांचीच होय हें कोणीहि सांगूं शकेल. ही गोष्ट केळकरांच्या भाषेचा अुत्कृष्ट नमुना म्हणून पाहण्यासारखी आहे. ती अशी-" चिमणीचें मोती कावळ्यानें उपटलें. तेव्हा चिमणाबाअीने कावळयास अुडवून देण्यास झाडास विनंति केली. झाड कबूल होअीना तेव्हा तें तोडण्यास सुतारास सांगितलें. सुतार नाकबूल झाला म्हणून अशा अनुपकारी मनुष्यास शासन करण्यास तिने राजास विनंति केली. राजास चिमणीचें सुखदुःख काय कळणार ? तेव्हा त्याने नाहीं म्हटल्यावर, त्याची गुरुकिल्ली हातीं असणाऱ्या राणीस ' राजावर रुसून' हा महत्त्वाचा व्यवहारनिर्णय करण्यास तिने सांगितलें. परंतु स्त्रियांसहि स्त्रियांची सहानुभूति नेहमीच वाटते असें नाही. तेव्हा सरळ अुपाय थकल्याने चिमणीने अुंदरास राणीचीं भरजरी वस्त्रें फाडण्यास सांगितलें. आणि मग तेथून तिने आपला अर्ज अनुक्रमें मांजर व कुत्रा येथपर्यंत नेअून, कुत्राहि अैकेना तेव्हा अेक लठ्ठसा सोटा गांठून त्यास कुत्र्याचे पाठींत बसण्याची तिने विनंति केली. तेव्हा सोटा कबूल झाला व तो कुत्र्याचे पाठींत बसतांच कुत्र्याने मांजरास, मांजराने अुंदरास, असें दहशत घालण्याचें