पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
३८]

[माझा जन्मभरचा


मी इतकेंच म्हणतों की गंभीर व ललित यांची सांगड घालण्याची माझी कल्पना, माझ्यापुरती तरी, मीं भरपूर अमलांत आणली व तो प्रयोग लोकांना आवडतो याचा अनुभव घेतला. केसरी आठवड्यांत दोनदा निघूं लागला, पानें वाढलीं, या गोष्टीने मला या कामीं फार सहाय्य झालें, व त्याचा मी माझ्यापुरता पुरेपूर फायदा घेतला. पूर्वी केसरी आठवड्यांतून अेकदाच निघणारा व पानें आठ असें असेपर्यंत, केसरीला ललित अंगें जोडण्याचें मनांत येतें तरी तें फारसें शक्य नव्हतें. मात्र राजकीय चळवळी जोरांत होत्या. तथापि, आठ पानांचा केसरी असतांच १९१०-११ सालीं मी नाट्य ग्रंथ, नाट्य प्रयोग, अित्यादिकांच्या परीक्षणास जागा देण्याला सुरुवात केली होती. असला अवांतर मजकूर थोडाच घालावयाचा; पण ललित प्रकार म्हणून तो वर्ज्य अशी विपरीत समजूत होअूं द्यावयाची नाही, किंवा तशी निषेधाची प्रथा पाडावयाची नाही, हा निश्चय.
 ( ३९ ) केसरींत टिळक व मी दोघेहि बरींच वर्षें अेकत्र लिहीत होतों. तथापि टिळकांची ओजस्वी, मतप्रचाराला सर्वस्वी योग्य व समर्थ, अशी भाषा मला लिहितां आली नाही. माझ्या भाषेंतलीं वैगुण्यें त्यांतील कांही गुणांबरोबर अखेरपर्यंत कायम राहिलीं. या दोन भाषापद्धतींची सविस्तर तुलनात्मक चिकित्सा १९३२ सालीं, पूर्वी केसरीचे व हल्ली मराठ्याचे संपादक रा. ग.वि. केतकर यांनीं 'लोकसत्ता' मासिक पुस्तकाच्या अेका विशेष अंकांत केली आहे. म्हणून त्यांच्या त्या लेखांतील कांही अुतारे देतों.
 " दोघांचेहि विशिष्ट गुण आहेत. या गुणांची अगर वैशिष्ट्यांची अशा प्रसंगीं सहजच तुलना मनांत अुभी राहते. पण दोघेहि अेकेका परीने श्रेष्ठ लेखक असल्याने अशा तुलनेनें कोणा अेकाच्या चाहत्यास वैषम्य वाटण्याचें मुळीच कारण नाही.
 " प्रथमच स्वतःवर येणारा आक्षेप घेअून बचावाच्या धोरणाने लिहिणें हा केळकरांच्या वर्तमानपत्रांतील लिखाणाचा विशेष आहे. तो टिळकांच्या लेखांत दिसून येत नाही. पण अुदाहरणार्थ घेतलेल्या लेखांत अेक अुपमांनी युक्त असें वाक्य आहे, व तें अितकें केळकरी नमुन्याचें आहे की तेवढ्या अेका वाक्यावरून हा लेख केळकरांचा हें कोणीहि मार्मिक मनुष्य सांगू