पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[३७


करिता आपल्या पक्षाचे अुमेदवार अुभे केले व डेमोक्रॅटिक स्वराज्य पक्षाचा जाहीरनामा लिहिला. तेव्हा निवडणुकीकरिता मतप्रचारार्थ तो संवाद विनोदी पद्धतीने मी लिहिला. त्यांत मतदारांचें महत्त्व वर्णन करतांना समाजांतील कनिष्ठ व अुपेक्षित वर्गाला महत्त्व दिलें होतें तें सर्वांना आवडलें.   (३८) सन १८९७ - ९९ नंतर सन १९१० पर्यंत माझा संबंध केसरीशीं जबाबदार संपादक म्हणून पुन्हा आला नव्हता. पण तेथपासून १९१४ सालीं टिळक तुरुंगांतून परत येअीपर्यंत, मला आपल्या संपादकीय कल्पना अगदी हव्या तशा अमलांत आणतां आल्या. मी या अवधींत निबंधलेखनाची हौस भरपूर पुरवून घेतली. पुढे १९१४ ते १९२० या सालांत टिळक जाग्यावर होते तरी माझ्या अंतर्व्यवस्थेंत ते लक्ष घालीत नसत. त्यांना हवें तेव्हा ते स्वतः लिहीत, व संपादक वर्गाला सांगून हवें असेल तें लिहवीत. पण अितर अंगांकडे ते लक्ष देत नसत. १९२० नंतर तर मी पूर्ण मुखत्यार असा संपादक व संचालक असल्यामुळे, मला माझ्या कल्पना हव्या तशा अमलांत आणतां आल्या. तसें करतांना वर दर्शविल्याप्रमाणें, मला काय ललित प्रकार लिहावयाचे ते मी लिहीत असेंच. परंतु अितर संपादक मंडळींच्या अंगीं ललितकलेची आवड असल्यास ती त्यांच्या पद्धतीने त्यांना पुरी करतां यावी, म्हणून त्यांच्याकरिता केसरीचें अेखादे पान राखून ठेवून सर्वस्वी त्यांच्या स्वाधीन करीत असें. हेतु हा की त्यांनी वाटेल त्या पद्धतीने आपला राखीव विषय स्वतः लेख लिहून, किंवा अुतारेहि देअून, सजवावा व मनोरंजक करावा. संपादकीय लेखांत ताठर गंभीरपणा असावा लागतो तो पूर्णपणें न पाळतां, थोडें मोकळ्या मनाने हसतखेळत विनोद करीत, विषयांत विविधता आणून, चित्ताकर्षक रीतीने मांडणी करतां यावी, म्हणून दरआठवड्याला असें राखीव सदर ( फीचर) योजून तें अेकेका अुपसंपादकाकडे दिलें जाअी.हेतु हा की आपला विषय ' फीचर'च्या रूपाने सजवावयाला त्याला अेक महिनाहि मिळावा. आणि अुपसंपादक असतांहि आपणाला कर्तृत्व प्रगट करण्याचें स्वतंत्र स्थान मिळालें त्याचा आपण अुपयोग कसा केला हें संपादकाला दाखवितां यावें. अशा रीतीने केसरीला ललित प्रकारचीं अनेक अंगें चिटकविण्याचा प्रयत्न मी केला तथापि दुर्दैवाने तो फार दिवस टिकला नाही. पण याचीं कारणें सांगून जागा अडविण्याची माझी अिच्छा नाही !