पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
३६]

[माझा जन्मभरचा


मनुष्य चाबुक घेअून संपादकावर धावत कसा नाही याचें आश्चर्य वाटतें. विलायतेंतला जातिभेद सर्वस्वीं निष्कारण म्हणूनच तर या जातिद्वेषाच्या प्रदर्शनाची मौज वाटते.

* * *

 जातवार संघाच्या मागणीला दिवसेंदिवस तरतरी येअूं लागली आहे. आजवर फक्त ब्राह्मणेतर संघ होता. त्यानंतर आता 'मराठेतर ब्राह्मणेतर ' संघ स्थापन झाला आहे, अुद्या 'शाण्णव कुळेतर - मराठेतर - ब्राह्मणेतर ' संघ निर्माण होणार. व परवां ' अकरमासेतर - शाण्णव कुळेतर - मराठेतर -ब्राह्मणेतर' संघ निर्माण होअील !

* * *

 सायमन कमिशनचा खरा उद्देश असा आहे की, राजकीय सुधारणांच्या प्रगतीच्या नांवाने 'कमींत कमी' किती हक्क हिंदी जनतेला देतां येतील. पण हेंच काम विलायतेंतल्या 'शिंपी संघा' कडे सोपविलें असतें तरी चाललें असतें. कारण, स्त्रियांचा लहंगा ' कमीत कमी ' किती कापड खर्चून तयार करतां येअील याविषयी या शिंपी संघाने हल्ली चौकशी सुरू केली आहे !

* * *

 विलायती स्त्रियांनीहि अलीकडे दैवी संपत्तीचा शोध चालविला आहे. अीश्वराच्या बागेंत (अीडन) पतीसह नांदणाऱ्या आदिम स्त्री अीव्हने, लज्जारक्षणार्थ वस्त्र म्हणून, अंजिराचें अेक पान लावून घेवून काम भागविलें होतें. व त्यानें काम तेव्हा भागतहि होतें. विसाव्या शतकांतल्या सुधारलेल्या स्त्रीचा निश्चय ही मितव्ययी सात्त्विक दैवी संपत् आपलीशी करण्याचा आहे असें म्हणतात."
 (३७) प्रसंगविशेषीं विषय सोपा व्हावा, चांगला समजावा, म्हणून मी प्रश्नोत्तररूप चर्चेचा अवलंब करीत असें. अुदाहरणार्थ, हुंडणावळ. ती चर्चा केसरीच्या अनेक अंकांत आली होती. आणि हुंडणावळीचा विषय या प्रश्नोत्तरांमुळे बरा समजला अशीं पत्रेंहि मला आलीं. असला अगदी पहिला संवाद ' म्हणा स्वराज्य मतदार की जय' या मथळयाखाली १९२० सालीं मी टिळकांच्या हयातींत केसरींत लिहिला. टिळकांनी नव्या कौ. निवडणुकी-