पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[ ३५


करण्याची जाहिरात दिली आहे. यांत मिस् मेयोच्या पुस्तकावर ताण होणार आहे असें म्हणतात. या नव्या पुस्तकांतील ' A bird's eye-view of India' हें मात्र अगदीं खरें असणार ! बाकीचें कसें कां असेना !

* * *

 हिंदी संस्थानांचा 'संबंध' आजवर हिंदुस्थान सरकाराशीं होता हें प्रसिद्धच आहे. पण त्यांना त्याची भीति वाटावयास लागलेली असून, त्यांना तो 'संबंध' यापुढे खुद्द राजे बादशाहांशीं जोडण्याची अिच्छा झाली आहे. पण स्वतः बादशहांना हा 'संबंध' पसंत आहे काय ! पूर्वी बादशहांनीं 'स्नेहसंबंध' जोडला तो प्रत्येक वेळीं अेकेकट्या संस्थानाशीं. पण शेकडो संस्थानांनीं अेकदम 'संबंध' जोडणें जरासें चमत्कारिच नव्हे काय ! कोणत्याहि गोत्रांतील अेका मुलीशीं विवाह करणें वेगळें. पण हें तर अेका 'गोत्रां' तील सर्व मुलींशीं अेकदम विवाह करण्यासारखे होत आहे !

* * *

 ग्लासगो येथील रेक्टरच्या निवडणुकींत मुख्य प्रधान मि. बाल्ड्विन हे निवडून आले. या निवडणुकीने स्कॉच लोकांचा वंश नामशेष होत आहे अशी हाकाटी करण्यांत आली आहे. स्कॉटलंडमध्यें आयरिश लोकांचा भरणा होअूं लागला आहे. ब्रिटिश लोक युनिव्हर्सिटीच्या निवडणुकी जिकूं लागले ! पार्लमेंटांत स्कॉटलंडच्या हितसंबंधाची हेळसांड होते अित्यादि कारणांनी आतां स्कॉच जातीचें संरक्षण करण्याकरितां जातवार संघ बनविण्यांत येत आहेत ! हिंदी लोकांत जातिभेद आहे म्हणून त्यांना हसा म्हणावें !

* * *

 हिंदुस्थानांत जातीच्या बाहेर लग्ने होत नाहींत, तेव्हा त्यांच्या जात्यभिमानाला कारण तरी आहे. विलायतेंत, ' बाप महमदखान आअी साळुबाअी' अशी लग्नें सर्रास होतात. अर्थात् यामुळे जातिद्वेष हटावा. पण केवळ पितृरक्ताच्या, म्हणजे आठ आणे शुद्धीच्या अभिमानाने विलायतेंत हा अिंग्रज, हा स्कॉच, हा आयरिश, हा वेल्श, असा भेद कडकडीत रीतीनें पाळतात. परस्परांत हेवादेवा मत्सर बेसुमार असतो. मुं. टाअिम्स पत्रांत स्कॉच लोकांच्या कृपणपणाची व दारूबाजीची थट्टा केली नाही असा अेकहि दिवस जात नाहीं. व थट्टा अितकी वाअीटहि असते की अेखादा स्कॉच