पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
३४]

[ माझा जन्मभरचा


शब्द अशुभवाचक मानतात हें प्रसिद्धच आहे. यावरून अेक 'तुलनात्मक संस्कृतिसंशोधक' कळवितात की, हिंदु लोक व अिंग्रज लोक हे मूळ अेकाच वंशाचे होत असा सिद्धान्त अवश्य काढावा. खोट्या 'साम्या'च्या समुद्रावरून जितके तरून गेले त्यापेक्षां त्यांत बुडालेल्यांचीच संख्या अधिक भरेल !

* * *

 ' वोल्शेव्हिक ' हा शब्द दिसण्यांत नवा दिसला, तरी तो संस्कृताचाच अपभ्रंश होय असेंहि या संशोधकाचें मत आहे. 'बोल्शेव्हिक ' म्हणजे ' बलसेवक ’. दुसरें-तिसरें कांही नाही. अचा ओ होणें व अची अि होणें हें फायलॉलजीच्या शास्त्राला धरूनच आहे. आणि श व स यांतील अभेद तर प्रसिद्धच आहे. अर्थात् हिंदुस्थानांत बोल्शेव्हिझम आली, तर त्याला बलसेवक या शब्दाचा जुनाच आधार आहे.

* * *

 'युवकसंघा 'चें अुदाहरण पाहून हिंदुस्थानांतील कांही वृद्धांनी अेक 'वृद्धसंघ' नांवाची संस्था काढण्याचें ठरविलें आहे म्हणतात. युवकसंघाने जसें ३५ व्या वर्षापुढचा कोणी सभासद घ्यावयाचा नाही असें ठरविलें आहे, तसेंच या वृद्धसंघांत ६० वर्षांच्या आंतला कोणीहि घ्यावयाचा नाहीं. कार्यक्रमांतहि तसाच स्पष्ट भेद ठेवला आहे. 'युवकसंघ ' जर 'काय वाटेल तें करणार' तर ' वृद्धसंघ' कांहीहि करणार नाही. ' या दोन संघांत प्रौढांना जागा नसल्याने त्यांनी आता आपलाहि अेक संघ बनविला पाहिजे नव्हे काय !

* * *

 हिंदुस्थानांत दोनतीन आठवडे घालवितांच, त्या देशाविषयी लिहिण्याची पात्रता आली असें समजून, किती तरी अिंग्रजांनी आजवर हिंदुस्थानविषयक पुस्तकें लिहिलीं आहेत. दोन-तीन आठवडेच कां होअीनात, पण त्या अवधींत प्रवाश्याला हिंदी लोक डोळ्याला दिसतात तरी. पण अशीं पुस्तकें लिहिण्याची पात्रता विमानविद्येबरोबर वाढीस लागली आहे. कराचीवरून अेकदम रंगूनला जाणाऱ्या अेका विमानांतील प्रवाशाने ' A bird's eye-view of India' या नांवाचें पुस्तक प्रसिद्ध