पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[३३


 अमेरिकन मंत्री केलॉग यांनी शांततावादी तह लिहिला. त्यावर युरोपियन राष्ट्रांनी अुड्या घालघालून सह्या केल्या. कांही राष्ट्रें तर असेंहि म्हणत होतीं म्हणतात कीं, " अरेरे, हा तहाचा मसुदा अितका चांगला आहे की त्यावर आम्ही अेक सोडून दोन हातांनी सह्या केल्या असत्या. पण-पण काय करावें ! दुसरा हात जरासा गुंतला आहे. " हा दुसरा हात बार भरलेल्या पिस्तुलाच्या घोड्यावर होता.

* * *

 हल्लीचे दिवस शांततावादाचे असल्यामुळे सगळीं नांवें त्याला शोभतील अशींच ठेवलीं पाहिजेत. फ्रान्सने असें ठरविलें आहे की, आपल्या युद्धखात्याला यापुढें 'शांततासंरक्षक खातें' असें कागदोपत्रीं म्हणावें. अिंग्लंडाने ' युद्धमंत्री ' हें नांव काढून टाकून फक्त ' लष्करमंत्री ' हें सौम्य नांव चालूं केलें आहे. पण अजून त्यांत कोणीकडून तरी शांतता असा शब्द घुसडावयाचा राहिला आहे. 'तोफे' ला ' अलगुज ', ' बाँबला ' ' कंदुक ', ' तरवारी ' ला ' लोहलता ', 'विषारी धुरा ' ला 'अैंद्रजाल' , ' हल्ला ' याला ' प्रगति ', ' तोफेच्या मारगिरी ' ला ' गुलालगोटयाचा खेळ ', ' रक्ता ' ला ' लाल पाणी ' व ' मृत्यू ' ला ' परम सुख ' अशीं अितर नावें सुचविण्यांत आली आहेत !

* * *

 पण युद्धाचीं स्मारकें म्हणून, शत्रूकडून पाडाव करून आणलेल्या व अितर तोफा, शहराशहरांच्या पदार्थसंग्रहालयांत ठेवल्या आहेत, व लहान मुलें त्या भयंकर वस्तु पाहतात त्याची वाट काय ? असा प्रश्न अिंग्लंडांतल्या का अेका मेयॉरने केला आहे. पण त्या तोफा दृष्टीआड करण्याला त्या मोडून-तोडूनच टाकावयाला कशाला हव्या ! शांतता परिषद व केलॉगचा तह हा ज्यांत कशिद्याने विणला आहे अशा रेशमी झुली या तोफांवरून घातल्या म्हणजे झालें !

* * *

 हिंदु लोकांत ' तेरावा' दिवस हा मृताच्या अुत्तरकार्यासंबंधाने प्रसिद्ध असल्याने तो अशुभ मानतात. अिंग्रज लोकांत ' तेरावा' हा संख्यावाचक
मा. ज. अु. ३