पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
३२]

[माझा जन्मभरचा


(३५) हॅवेलॉक अेलिस हेंच मिस मेयोला अुत्तर. " तुझीच काठी आणि तुझ्याच पाठीं. "
( ३६ ) पण अशाने बिलाविरुद्ध चळवळ करण्याची जबाबदारी चुकत नाही बरें का हिंदूंची ! ध्यानांत ठेवा. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.
( ३७ ) आणि स्वत: अमेरिकेला गेल्याशिवाय शिकागोची घाण दिसणार नाही.
(३८) मग पाठवाना हो जोशी यांनाच सगळे मिळून अमेरिकेला !
( ३९ ) कल्पना चांगली आहे. पण फिरून सुवर्णदानाचा प्रसंग आणलातच ?
(४०) करावें काय ? गोल्ड् स्टँडर्डचे दिवसच आहेत !
( ४१ ) पण गोल्ड स्टँडर्ड ठरवावयाला गोल्ड करन्सीचें कारण नाही, असेंहि ठरलें आहे म्हणे !
(४२) अेकूण तुम्ही कांहीअेक न करतां सर्व परस्पर साधणार म्हणतां ! फार चांगलें ! देव हितकरी असला म्हणजे असेंच परस्पर साधतें ! ' स्वस्थ आणि स्वस्त ! '
( ३६ ) अशाच प्रकारचें ' रजःकण ' या मथळयाचेंहि अेक सदर घातलें होतें त्याचा अेक अुतारा देतों.

रजःकण

 " ज्यांनी चोरी करून पचनीं पाडली ते प्रामाणिकपणाची स्तुति करतातच. पण ज्यांना पुढे चोऱ्या करावयाच्या आहेत तेहि स्तुति आगाअूच करूं लागतात. अिंग्लंड, फ्रान्स वगैरे लढाअू राष्ट्रांनी शांततादेवीची पूजा आरंभिलीच होती. पण आता अमेरिकेनेहि ती सुरू केली आहे. कारण आपणाला पुढे युद्धें करावीं लागणारं अशीं स्वप्नें तिला पडूं लागलीं आहेत. पाहा ! दुःस्वप्नांचा आगाअूच परिहार !

*   *   *