पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[३१


(२१) हो, हो, सुवर्णदानहि करूं. कन्यादानाच्या वेळीं ताम्हनांत सोन्याचा तुकडा टाकावाच लागतो.
(२२) तोच जरासा मोठा अितकेंच !
(२३) पण अितकें करण्यापेक्षा कायदाच पाळला तर ! कदाचित् मुलीचें कल्याण - ?
(२४) हो, स्वार्थ-परमार्थ अेकदम साधले !
(२५) तें काही नाही. घी देखलें पण बडगा नाही देखला म्हणावें शारदा बिल पास करणारांना !
(२६) वाचा म्हणावें सोलापूरच्या वे. शा. सं. लअूळकरशास्त्र्यांची नोटीस.
(२७) हा सोन्याचा सोटा घाला प्रथम जयकरांच्या पाठींत. आहेत श्रीमंत. सहज सोसतील.
( २८ ) पण खरा बडगा : पुढेच आहे. आणि तो मात्र थट्टेचा विषय नव्हे बरें का.
(२९) निपाणीस न्यूयॉर्क आणि शिकारपुरास शिकागो होअील तेव्हा तो पाठींत बसेल !
(३०) विचारा त्यांना लाला गौवाचें 'अंकल शॅम' हें पुस्तक वाचलें का म्हणून!
(३१) पण परवा डॉ. शेरवुड अेडी हे पुण्यांत कोणाजवळ म्हणाले म्हणे की " गौवा म्हणतात, मी अमेरिकेला न जातांच तें पुस्तक लिहिलें !"
(३२) मग यांत अमेरिकेला जायलाच कशाला हवें ? पुण्यास जोशी व चिपळूणकर यांनी नाही का अमेरिकेची माहिती सांगितली ?
(३३) अगदी बरोबर. कानाने अैकतांना नाकाला पदर लावावा लागत होता.
(३४) अहो ! सत्य तें सत्य. तें काय प्रत्यक्ष डोळ्यालाच तेवढें दिसतें वाटतें ? ' चक्षुर्वै सत्यं ' ही आपली अेक म्हण आहे अितकेच !