पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
३०]

[माझा जन्मभरचा


(१०) आणि शारदा-बिलांत फक्त चौदा वर्षें घातली तर, याच तुळशीबागेंत, "१६ वर्षांपर्यंत लग्न करूं नये” अशा कराराची सूचना टिळकांनीच सुधारकांपुढे टाकून त्यांना निरुत्तर केले होतें ! आणि तेहि ४० वर्षांपूर्वीं !
(११) मिळून तत्त्वाकडूनहि टिळकांच्या नांवाचा पाठिंबा मिळण्यासारखा नव्हता म्हणतां ?
(१२) पण आम्ही सनातनी लोक टिळकांवर विसंबलों नाही. आणि त्यांच्या अनुयायांवर तर नाहीच नाही ! खुद्द टिळकांवरच ग्रामण्य केलेले आम्ही !
(१३) स्वावलंबनावर आमची भिस्त आहे. कायदा मोडूं, दंड देअूं मग कायदा अुरला कोठें ?
(१४) तेवढ्याने नाही भागलें ! धार्मिक चळवळहि आमची सुरूच आहे. मद्रासकडे अतिरुद्र झाल्याचें अैकलें नाहीत वाटतें ?"
(१५) अैकलें. पण " स्वाहाकाराने जितकीं चिलटें मारलीं तितकीं नवीं चिलटें, भोजनाची झोड अुठून घाण न निघाल्यामुळे अुत्पन्न झालीं” असें अेका थट्टेखोर मद्राश्याने लिहिलें आहे म्हणे !
(१६) तसेंच अेक दिवस तरी कांही ठिकाणचा गोवध शारदा बिलाच्या निषेधार्थ वांचला ही पुण्याअीची भर पडलीच की नाही ? ती फळ दिल्याशिवाय कशी राहील ?
(१७) अहो ! पण त्या पुण्याअीला शेंडी नाही, दाढी आहे म्हणतात !
(१८) होय. मुसलमान खाटकांनीच केली म्हणून ती गोष्ट झाली. पण खाटकाच्या सुरीपासून जर गाय वांचते तर शारदा बिलापासून मुली वांचविणें काय कठिण ?
(१९) थांवा थोडे ! माघ-फाल्गुन अुजाडूं दे, म्हणजे पाहा किती तरी बालविवाह घडून येतील ते. अुरलेली अेक सोन्याची संधि कोण घालवितो ?
(२०) आणि ती घालविली तर पुढे वैशाखापासून 'सोन्याचें दान' करण्याची पाळी यायची दंडादाखल !