Jump to content

पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[१२१


to Einstein, while in all cases where visual art is concerned Einstein is, on his own confession, a dog in comparison with any good painter or even an appreciator of painting. ( P. 62)
 ( ११४) जुन्या काळी अेका अंगाला विद्येचें कौतुक करणारा राजा, आणि दुसन्या अंगाला त्याच्या पदरी आश्रित होअून जीवयात्रा कंठणारे, त्याच्या मूठभर किंवा ताटभर रुपये मोहोरांच्या देणगीने स्वतःला संपन्न मानणारे, त्याची हांजी हांजी करणारे, त्याचीं स्तुतिस्तोत्रें रचून गाणारे शास्त्रीपंडित, यांची जोडी लक्षांत घेतली तर काय अनुमान निघतें ? 'सुकविता यद्यस्ति राज्येन किम् ' हें सुभाषित मानभावीपणाने तोंडाने म्हणायला ठीक आहे. पण कोणत्या राजाने प्रत्यक्ष ' सुकविता' स्वीकारून राज्य सोडून दिलें ? अुलट, ' तुम्हांला राज्य देतों तें घ्या. मात्र अट ही की, साऱ्या जन्मांत तुम्ही कोणतेंहि पुस्तक वाचतां किंवा लिहितां कामा नये, कविता करितां किंवा गातां कामा नये' असें म्हणण्याला कोणी अीश्वर अुभा राहिला तर त्या अटीवर तें राज्य स्वीकारणार नाही असा अेकहि साहित्यिक किंवा वाङमय-कलावंत मिळणार नाही. 'बुभुक्षितैः व्याकरणं न खाद्यते, पिपासितैः काव्यरसो न पीयते' अशीहि वचनें आढळतात. मग देहाच्या साध्या गरजा भागविण्याचें साधन जर प्रसंगीं काव्य-साहित्यापेक्षा अधिक ठरतें, तर राज्यासारख्या अैश्वर्याची गोष्ट कशाला ? व्यवहारांत अितर रीतीने यशस्वी ठरणाऱ्या अविद्वानांनी विद्वानांना मोठे म्हणणें हें हीनगंडाचें द्योतक नसेल काय ? पण हा न्यूनगंड अेकतर्फी नाही हीहि गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे. आम्हाला तर वाटतें की, धनाढ्य लोक विद्वानाला मनांतून जितका मान देतात तितकाच विद्वान लोकहि धनाढ्याला मनांतून देतात, कारण अुघड आहे. विद्वत्तासंपादन हें जसें अेक प्रकारचें सुयश, तसेंच धनाढ्य होण्याला लागणारें व्यावहारिक चातुर्य व बुद्धिमत्ता लाभून तिचा सुपरिणामकारक अुपयोग करतां येणें हेंहि यशच आहे. विद्वानाला मोठेपण दिलें म्हणून त्याला कोणी राज्यावर बसवीत नाही. तसेंच अलट मोठा वीर किंवा मुत्सद्दी झाला तरी त्याला पंडितसभेचें अध्यक्षस्थान कोणी देणार नाही. तात्पर्य, प्रत्येकाचें महत्त्वाचें स्थान