Jump to content

पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
१२०]

[माझा जन्मभरचा


नांव देतां येअील. अर्थात् श्रेष्ठकनिष्ठपणाची ही तुलना जो तो आपापल्या स्वभावाप्रमाणें करतो. त्या तुलनेला कांही निश्चित वाह्यगमक नाही.
 ( ११३) वाङमय साहित्यांतील पंडितगिरी व निष्णातत्व ही जी अेक कित्येकांना हस्तगत होण्यासारखी विद्या किंवा कला आहे, तिचें तुलनात्मक श्रेष्ठत्व कनिष्ठत्व ठरविण्यांतहि हेच दोन स्वभावभेद दिसून येतात. मी स्वतः या विद्येला कलेला अितरांपेक्षा श्रेष्ठ मानणारा नाही. साहित्यिक हे आपणाला अितरांपेक्षा अुगीचच श्रेष्ठ मानतात ! लौकिक संसारांत अितर व्यावहारिक विद्या व कला याच साहित्यापेक्षा अधिक तात्कालिक अुपयोगी ठरतात. अर्थ व काम हे समाजाचे दोन मुख्य पुरुषार्थ घेतले तर, त्यांचीं सफलता अितर विद्या व कलाच अधिक करितात. अुदाहरणार्थ, अर्थोत्पादक अुद्योगधंद्यांतलें यश हे साहित्यांतल्या यशापेक्षा कनिष्ठ कां म्हणावें ? मला असे यशस्वी व्यापारी अुदमी कारखानदार माहीत आहेत की, त्यांना साध्या लिहिण्यावाचण्यापलीकडे कांही येत नाही. तथापि ते आपल्या अशिक्षित बुद्धीमत्तेच्या बळावर अितकें यश व संपत्ति मिळवितात की, श्रेष्ठांतले श्रेष्ठ असे दहा पांच साहित्यिक ते सहज आपल्या पदरीं ठेवतील.
 काय मौज आहे पाहा! ज्याला गणित येतें त्याची मति तत्त्वज्ञानांत शिरत नाही. तत्त्वज्ञान्याच्या बुद्धीला संगीत वावडें वाटतें. संगीतशास्त्री बुद्धिबळाच्या डावांत हरतो. बुद्धिबळपटु लोकांना भौतिकशास्त्र दूर ठेवावेंसें वाटतें. भौतिकशास्त्री मंडअींत भाजी विकत घेण्याच्या व्यवहारांत फसतात. बाजारपेठेंतील व्यवहारांत निष्णात असणाऱ्या लोकांना राजकारणाचीं तत्त्वें समजत नाहीत. राजकारणपटु मुत्सद्द्यांना अर्थशास्त्र चांगलें येत नाही. अर्थशास्त्रज्ञांना काव्याच्या चार ओळी लिहितां येत नाहीत. कवि हे व्यवहारशून्य असतात. तात्पर्य, अशा रीतीने ही सांखळी केव्हा संपायचीच आहे. बुद्धीच्या अपूर्णत्वाविषयी अेकांगीपणाविषयी आल्डस् हक्स्ले हा ' Proper Studies' या पुस्तकांत म्हणतो-
 'As a dog is to me so am I musically to Beethoven,and mathematically to Einstein. The only consolation is that Beethoven himself is a mathematical dog in relation