Jump to content

पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[११९


 [ माझ्या वाडमय शाखांवरी । फुलली पुष्पें नानापरीं
  तयां करितो नमस्कार । प्रेमें जोडुनि दोन्ही कर
  झालें सार्थ तुमचे जिणें । पर-अुपयोगाच्या कारणें
  शोभा सुगंधाच्या दानें । तुम्ही तोषियली जनमनें
  अुद्या कोमेजला तरी । तुम्हां रक्षिल धन्वंतरी
  अचुक गुणकारी औषधी । म्हणुनि अपुल्या बटव्यांमधी
  तुम्हां मागुन मी येअिन । मृत्यु दुःख न मानुन ]

 पण अेकंदरीने वाङमय व साहित्य यांच्याविषयी अेका मुद्दयाची चर्चा करावीशी वाटते. तो मुद्दा हा की जंगांत अितर गोष्टींच्या तुलनेने वाङमय व साहित्य यांचें मूल्य व महत्त्व खरें किती आहे ? कोणतीहि विद्या किंवा कला घेतली तर तिला तिच्या पुरतें स्वतंत्र मूल्य व महत्त्व असतेंच. म्हणून त्या निरनिराळ्या मूल्यांची परस्पर तुलना करणें कठीण जातें. परंतु अेक विद्या किंवा कला ही दुसरीपेक्षा श्रेष्ठ की कनिष्ठ ठरविण्याच्या दोन रूढ रीति किंवा पद्धति आढळतात. त्यांना शास्त्रीय म्हणतां येत नाही. पण दोन प्रकारच्या मनुष्यस्वभावामुळें त्या अनुभवाला येतात अेवढें मात्र खरें. अेक स्वभाव असा की, जी विद्या किंवा कला आपणाला साध्य होते किंवा चांगली येते ती श्रेष्ठ मानावयाची आणि अितर सर्व त्या मानाने कनिष्ठ ठरवावयाच्या. ही ' अहंकारदूषित' रीत होय. व्हॉल्टेअरच्या चरित्रांत खालील अन्योक्ति आढळते. " One day, says Voltaire, I heard a Mole arguing with a May-beetle in front of a summer house which I had just put up at the bottom of my garden. "That is a fine structure" said the Mole; "it must have been a powerful Mole indeed that produced such a work.” “ You are joking" said the May-beetle. “A May-beetle, replete with genius, was the architect of that fine building. ' या संभाषणांतून निघणारा बोध स्पष्ट करून सांगण्याचें कारण नाही. दुसरी याच्या अगदी अलट अशी की, जी विद्या किंवा कला आपणाला साध्य अनुकूल नाही ती आपणाला साध्य असणाऱ्या विद्येहून कलेहून श्रेष्ठ मानावयाची, व आपली ती कनिष्ठ मानावयाची. या रीतीला ' विनयदूषित' असें