Jump to content

पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
११८]

[माझा जन्मभरचा


टिळकचरित्राचे तीन खंड हे कर्तव्यबुद्धीने लिहिले गेले. मराठे व अिंग्रज हा ग्रंथ पेशवाअीचें शतसांवत्सरिक श्राद्ध व प्रसंगोपात्त म्हणून अितिहासविषयाच्या प्रेमाने लिहिला. मी अितिहाससंशोधक नाही. पण अतिहास हा माझा अेक अत्यंत आवडीचा विषय आहे व अितिहासाच्या तत्त्वज्ञानांत मला थोडी गती आहे. हास्यविनोद-मीमांसा हा केवळ आवडीचा विषय म्हणून लिहिला. नाटकें कांही नाट्यप्रियतेमुळे व कांही द्रव्यप्राप्तीकरिता लिहिलीं. कादंबऱ्या व लघुलेख ( लघुकथा, लघुनिबंध, वक्रोक्ति लेख, विनोदी चुटके) हे सर्व कलाविलासाच्या हौसेमुळे लिहिले, आणि भारतीय तत्त्वज्ञान हा ग्रंथ केवळ स्वतः विषयाभ्यास करावा म्हणून, आणि त्याचबरोबर निवळ मराठी वाचकांना अुपयोगी पडावा म्हणून लिहिला. तात्पर्य, 'केवळ संशोधनात्मक ' हा प्रकार दिला असतां, बहुश्रुत माणसाच्या दृष्टींत येणारा असा कोणताहि प्रकार मी सोडला नाही. मात्र यांत माझ्या बुद्धिमत्तेपेक्षा आवड व अभिरुचि यांच्या दुर्दमतेला अधिक श्रेय मी देतों. माझ्या समकालीन पिढींत माझ्यापेक्षा अधिक बुद्धिवान असे जितके लोक आहेत की, त्यांच्यापुढे मी ठेंगणाच होअीन. पण दुर्दैवाने त्यांना ग्रंथ कर्तृत्वाची आवडच नाही त्याला कोण काय करणार ?
 (११२) अशा रीतीने मी हें आत्मपर विवेचन किंवा समालोचन संपवितों. आणि शेवटी अेका अिग्रज कवीच्या शब्दांनी असें म्हणतों-
  Farewell dear flowers
   Sweetly your time you spent
  Fit while you lived
   For smell or ornament
  And after death for cures
   I follow straight
  Without complaints or grief
   Since if my scent be good
  I care not if
   It be as short as yours.