Jump to content

पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
११२]

[माझा जन्मभरचा


'भेट' म्हणून देअीं, सहसा 'अभिप्रायाकरिता ' म्हणून नाही. मला फक्त त्याच अभिप्रायाचें महत्त्व वाटे की, जो सहज खासगी भाषणाच्या किंवा सार्वजनिक चर्चेच्या ओघांत अवचित प्रगट झाला असेल. मग तो बरा असो, वाअीट असो. आपल्या बरोबरीचा तज्ज्ञ मनुष्य, तो पुस्तक खुणा करून वाचणार, अभिप्राय लिहिणार, आवर्जून आपणाकडे पाठविणार, आणि भीडमुर्वत न ठेवतां खऱ्या मनाने गुणदोषदर्शन करणार असा योग येण्याची आशाच फारशी करूं नये. पुस्तक किती खपलें यावरून लोकांना तें कितपत आवडलें याचा अंदाज कांही करतां येतो. पण त्यांत फक्त सामान्य वाचकांचा अभिप्राय कळतो. खऱ्या तत्त्वज्ञाचा कळत नाही. तात्पर्य, याहि बाबतींत, म्हणजे आपण निर्माण केलेल्या ग्रंथावर स्वतः आपण जो अभिप्राय मनाने देअूं तोच शेवटीं खरा. कारण आपला ग्रंथ झाला म्हणून त्यांतील गुणदोष आपणाला कळत नाहीत असें होत नाही.
 (१०४) दुसरीहि ओक अनुभवाची, मर्माची म्हणून गोष्ट सांगतों. ती ही की, रीतसर अभिप्रायाकरिता जशीं मी माझीं पुस्तकें सहसा लोकांकडे पाठविलीं नाहीत, त्याचप्रमाणें कोणालाहि " माझें तें अमुक अमुक पुस्तक तुम्ही वाचलें का ? " असेंहि विचारीत नाहीं. तें वाचल्याचा अुल्लेख त्याने होअून आपल्या भाषणाच्या ओघांत केला तर मात्र, अुन्हाळयांत अंगावर आलेल्या थंड वाऱ्याच्या झुळुकेसारखा, तो अुद्गार सुखद वाटतो. आपण होअून लोकांना 'माझें पुस्तक तुम्ही वाचलें का?' असें विचारून त्याने खरें किंवा खोटें ' होय' म्हटल्याचें समाधान मानणें हें, आपल्याच हाताने पंखा सुरू करून वारा अुठवून अंगावर घेण्यासारखें मला हीन प्रतीचें वाटतें. त्याला आभाळांतून आलेल्या वाऱ्याच्या झुळकेची किंमत नाही. शिवाय माझ्या परिचयांतीलच कांहीं व्यक्ति अशा भावनेच्या आहेत की "कांहो माझें अमुक अेक तें पुस्तक किंवा लेख तुम्ही वाचला आहे का " असें मीं कारणपरत्वें म्हणावें, विचारावें, आणि “ छे: मी तें मुळीच वाचलें नाही (कदाचित् वाचलेलें असूनहि ! ) असें तुच्छतादर्शक अुत्तर देअून माझा अपमान करतां यावा याच्या संधीची जणूं काय वाट पाहतच बसलेले असतात. मग मी त्यांना ती संधि कां द्यावी ? कारण अेखाद्याने आपणाला अुत्तर दिलें की ' तुमचें पुस्तक मीं वाचलें नाही' तर अुगीचच वाअीट