Jump to content

पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[१११


बोटीने मुंबअीस येणार आहें व लागलीच पुण्यास जाणार आहें, तरी ठरल्याप्रमाणें गुरुवारीं रात्रीं माझी गांठ घ्यालच. अशा तऱ्हेने 'लागलीच' हा शब्द मी अुपयोगांत आणला. पण त्यामुळे माझ्यामध्ये व माझ्या मित्रामध्ये तात्त्विक वाद निर्माण होअून वाद अेकेरीवर आला. माझें म्हणणें असें की ' लागलीच ' हा शब्द मराठी भाषेंत आहे व तो लिहितांना अुपयोगांत आणतात व तेंच बरोबर आहे. मित्राचें म्हणणें असें आहे की, त्या ठिकाणीं लागलीच पुण्यास जाणार आहें असें न म्हणतां ' लागलाच' पुण्यास जाणार आहें असें म्हटलें पाहिजे, 'लागलीच' म्हणणें मूर्खपणाचें आहे. मित्राचें म्हणणें असें आहे की, त्या ठिकाणीं जर अेखादी स्त्री असेल तर तिने ' लागलीच ' जाणार आहें असें म्हटलें पाहिजे, पुरुषांनी 'लागलाच' असें म्हटलें पाहिजे. मी पुष्कळांना हा प्रश्न विचारला, पण कोणी म्हणतात लागलीच हा शब्द अशा तऱ्हेने अुपयोगांत आणला जातो व तो बरोबर आहे. कोणी तिसरेंच सांगतात. त्यामुळे समाधान होअीना. शेवटी आपल्याकडे हा वाद सोपवावयाचा व आपण जो निकाल द्याल तो मान्य करावयाचा असें त्याच्यांत व माझ्यांत ठरलें. तरी 'लागलीच' हा शब्द आहे का ? व तो अशा तऱ्हेने अुपयोगांत आणणें चूक आहे की बरोबर आहे, तें आपण सांगितल्यास आभारी होअीन. तरी कृपा करून आमचें समाधान कराल अशी विनंति आहे. "
 या पत्राला मीं तत्परतेने पानभर सविस्तर अुत्तर पाठविलें. मी संभाळून ठेवलीं असतीं तर अशीं पत्रे किती तरी मजजवळ जमलीं असतीं. याचप्रमाणें संपादक या नात्याने मजकडे आलेल्या शेंकडों गमतीदार पत्रांची आठवण होते. पण तो विषय वेगळा आहे.
 * (१०३) असो. मौज ही की, सर्वांत कमी अभिप्राय लिहिले गेले किंवा प्रसिद्ध झाले असतील तर ते माझ्याच पुस्तकांवर. कारण, अगदी प्रारंभी काय झालें असेल लक्षांत नाही, पण पुढे पुढे मी स्वतः होअून माझीं पुस्तकें अभिप्राययाचनेने कोणाकडे पाठवीतच नव्हतों. अभिप्रायार्थ पुस्तक धाडावयाचें तें प्रसिद्धीच्या आशेने प्रथम वर्तमानपत्रांकडे. पण वर्तमानपत्री अभिप्रायाची किंमत मला स्वतःला माहीत असल्यामुळे मी त्यादिशेला फारसा गेलों नाही. खासगी स्नेह्यांनाहि मीं पुस्तकें दिलीं तरी तीं