Jump to content

पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[११३


वाटण्याचा मनुष्यस्वभाव असतो की नाही ? वास्तविक कोणाहि सुज्ञ ग्रंथकाराला तसें वाअीट वाटण्याचें कारण नाही. कारण तुम्ही अगदी मोठे लोकप्रिय ग्रंथकार झालां, तरी तुमचीं सर्व पुस्तकें सर्व मराठी वाचक वाचतील, वाचूं शकतील, अशी अपेक्षा तुम्ही कां करावी ? पुस्तकें विकलीं जातात, किंवा देणगीरूपाने दिली जातात, त्या प्रत्येकागणिक सुमारे दहा-वीस वाचक त्यांना लाभलें तरी पुष्कळ झाले ! स्वतः तुम्ही ग्रंथकार असलां तर आपल्या ठिकाणीं विचार करून पाहा की तुम्ही तरी लोकांचीं पुस्तकें कितीशीं वाचतां ?
 (१०५) मला माझ्या म्हातारपणांत वाङ्मयलेखन हें व्यसनासारखें जडलें आहे असें कोणी म्हटलें ( आणि मी स्वतःहि तें थोडेंसें कबूल केलेंच आहे ) तर त्याचें मला वाअीट वाटणार नाही. पण अिच्छा दोनच. या व्यसनाच्या भरांत माझ्या हातून कदाचित् कांही नीरसहि वाङमय लिहून होवो; पण आजकाल ललिताचा आत्मा होअून बसलेलें अश्लील अभद्र असें वाङ्मय - समाजाला अितरहि रीतीने अपायकारक असें वाङ्मय - लिहिलें न जावें. असलें वाङमय मीं यापूर्वी सहसा कधी जाणून लिहिलें असें स्मरत नाही. आता मनुष्य हा चुकीला पात्र असल्यामुळे, नियमाला अपवाद किंवा गोऱ्या अंगावर तीळ, या न्यायाने अेखाददुसरें अुदाहरण कोणी कोठे कोठे दाखवूं शकेल. परंतु माझ्या चवदा-पंधरा हजार पृष्ठांच्या वाङ्मयांतील अभद्र अश्लील लिखाण काढून दाखवावयाचें झालें तर त्याकरिता अेखादें संशोधक कमिशनच बसवावें लागेल ! दुसरी अिच्छा ही की, पूर्वी कांही वृद्ध साहित्यिकांवर प्रसंग आल्याप्रमाणें, आपलीं पुस्तकें खाकेंत मारून लोकांच्या घरोघर जाअून तीं विक्रीचीं म्हणून त्यांच्या पदरांत बांधण्याची वेळ न यावी. माझी बुद्धि निरोगी राहील तोंपर्यंत माझी पहिली अिच्छा बहुधा सफळ होत राहील. मृत्यूपर्यंत बुद्धि निर्विकार राहणें हें अीश्वराचें देणे. आणि वार्धक्याच्या आपत्तीबरोबर बुद्धीच्या वैकल्याची आपत्ति ओढवणें यापेक्षा मरण बरें. पण या गोष्टी कोणाच्या हातच्या नसतात ! त्याविषयी आपली अिच्छा प्रकट करणें अितकेंच माणसाच्या स्वाधीन असतें, म्हणून तितकेंच मी या ठिकाणीं करीत आहें.
मा. ज. अु. ८