Jump to content

पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
१०८]

[माझा जन्मभरचा


मित्र म्हणतील ' त्याचें जीवन यशस्वी झालें. कारण त्याने आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक केलें.' पण या दोनहि प्रकारांत अेक काढून घ्यायला अेक द्यावें लागतें. टीकाकार अमित्र तुमचें यश काढून घेतात; पण गुण कबूल करतात ! अुलट मित्र अपयशाचा आक्षेप खोडून काढतात; पण मुळांत तुमचे गुण कमी होते असें त्यांच्या समर्थनांतूनच निघूं पाहतें !अेतावता मनुष्य हा स्वतःविषयीं जें म्हणेल तेंच शेवटीं ग्राह्य धरावें लागतें. लोकांना तुमची योग्यता ठरविण्याचा अधिकार जितका आहे तितका तुम्हांलाहि कां नसावा ? मात्र तुमच्यामध्ये न्यायबुद्धि आणि आत्मविश्वास पाहिजे. म्हणजे मग लोकांच्या मतावर तुम्ही आपली योग्यता किंवा सुखदुःखाची कल्पना सर्वस्वी अवलंबून ठेवणार नाही. तुम्ही अल्पसंतुष्ट असाल तर त्या संतोषाचा आनंद तुम्हांलाच. तुम्ही हावरे असाल तर त्या असंतोषाचें दुःखहि तुम्हांलाच. तुमच्याविषयींच्या मताने लोक सुखी होत नाहीत किंवा दुःखीहि होत नाहीत. केवळ ते आपल्या मतप्रदर्शनाची हौस फेडून घेतात !
 (१००) वाङमयसेवेत मीं स्वतःची हौस फेडून घेतलीच; पण त्याबरोबर हेंहि केलें की, शक्य तितका अितर लोकांच्या अुपयोगी पडलों. कोणी मजकडे येअून ' हा माझा लेख, हें माझें पुस्तक, वाचून पाहून अभिप्राय द्या' असें म्हणाला, आणि मीं त्याचा अव्हेर केला असें बहुधा घडलेंच नाही. त्यामुळे माझें प्रस्तावनात्मक परीक्षणात्मक वाङमय पुष्कळच झालें आहे. आता अभिप्राय कमीअधिक मोठा लिहिणें हें अनेक अवांतर गोष्टींवर अवलंबून राही हें सांगावयासच नको. तसेंच अभिप्रायार्थ आलेल्या कांहीं पुस्तकांचा राग येअी म्हणून मी फार तर बरेच दिवस मौन धरीत असें. हेतु हा की अुपेक्षेवरून परस्पर ज्याचें त्याने अुमजावें. तथापि कांही ग्रंथकार पिच्छाच पुरवीत, तेव्हा असा अभिप्राय लिहून देअीं की, तो त्यांना प्रसिद्ध करण्याची अिच्छा राहूं नये. अर्थातच तो ते छापीत नसत. पण कांही लोकांना अभिप्रायांत आपली नाजुक निंदा किंवा थट्टा आहे, हें न अुमजल्याने ते तोहि अभिप्राय छापीत ! याचें अेक अुदाहरण सांगतों. अका कवीने 'सौंदर्यलहरी ' नांवाचें काव्य लिहिलें. मला तें नीरस वाटलें. पण ग्रंथकाराचा आग्रह असा की, मी अभिप्राय तर लिहून द्यावाच; पण तोहि समवृत्त समश्लोकी असावा. 'सौंदर्यलहरी' हें काव्य