Jump to content

पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[१०९


पाहावें तों तें सुमारच होतें. अशा काव्याला कवितावद्ध प्रस्तावना ती काय लिहावी ? तेव्हा मी मनांत रागावून हे खालील तीन श्लोक लिहून पाठविले, व आग्रह धरला की, प्रस्तावनेच्या रूपाने हे श्लोक, फेरबदल न करतां, जसेच्या तसे घालणार असाल तरच त्यांचा अुपयोग करावा व माझी सही घालावी. पण तुमच्या श्लोकांत माझे श्लोक घुसडून देअूं नयेत. बिचाऱ्याने मर्म न अुमजतां तींहि पद्ये छापलीं !

 मीं प्रस्तावनेदाखल श्लोक रचून पाठविले ते असे :-

  नटे वर्षाकालीं सजलधन संभार गगनीं
  स्फुरे विद्युत्जिव्हा चमचम करोनि झणिझणीं
  शिखी मोदें नाचे थयथय पिसाराहि पसरी
  बघोनी घ्या तेव्हा अनुपमचि सौंदर्यलहरी ॥ १ ॥

  परी लांडोरीने करुनि अनुकारा अुभविलें
  स्वपार्श्वी पुच्छातें तरि न गमतें नर्तन भलें
  कळोनी येअी कां तुज सहज धीमंत चतुरा
  दिला दुर्दैवाने तिज नच पिसारा नच तुरा ॥ २ ॥

  स्थळ सौंदर्याच्या कविस जगतीं वाण न मुळीं
  स्वतंत्र स्फूर्तीने पडतिल सदा येअुनि गळीं
  हठाने हव्यासें पदसमिति काव्यब्रुव करी
  कशा निर्मी सांगा मग अकवि ' सौंदर्य-लहरी' ? ॥ ३ ॥

 (१०१) अभिप्राय देण्याच्या कामांत माझा भिडस्त स्वभाव मला फार नडला. कारण तेंच अेक काम नेहमीं फार पडे. अलीकडे दरदिवशीं अेखादें नवें पुस्तक-पत्रक अभिप्रायार्थ टेबलावर येअून पडूं लागल्यापासून तर, अभिप्राय देतां देतां मी हैराण झालों. कोणत्याहि राजकीय सम्राटाला त्याच्या खजिन्यांत येअून पडणाऱ्या ' करभारा'चा कंटाळा येणें शक्य नाहीं. पण या बिचाऱ्या 'साहित्यसम्राटा 'ला तो करभार नको नको असें होून गेलें. अभिप्राय मागणाराला थोडा तरी अुपयोग व्हावा, असा अभिप्राय दिला पाहिजे ही स्वभाव-दाक्षिण्याची बळजोरी. अुलट