Jump to content

पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[१०७


आवड या गोष्टी विशेष वाखाणण्यासारख्या आहेत. त्यांनी आपल्या वडिलांचें चरित्र संस्कृत पद्यांत लिहिलें आहे. त्यांना माझ्या संस्कृत भाषेच्या आवडीची बातमी कोणी सांगितली. असो, किंवा माझ्या अेरवीच्या प्रसिद्धीवरून मला संस्कृत येतें असें त्यांनी अनुमान केलें असो. परंतु या पद्यमय संस्कृत ग्रंथाला मी प्रस्तावना लिहावी, अशी विनंति त्यांनी मला केली. हाच त्यांचा माझा प्रथम परिचय होता. तथापि मी ती विनंति मान्य केली. व ती प्रस्तावना संस्कृत पद्यात्मक अशीच लिहून दिली. आणि हीं पद्यें त्यांना अपेक्षेपलीकडे चांगली वाटली असें पत्रच त्यांनी मला लिहिलें आहे. म्हणून त्यांचेच शब्द देतों--

 " तुम्ही माझ्या वडिलांच्या (शंकर पाण्डुरंग पंडित ) संस्कृत चरित्रग्रंथालाजी श्लोकबद्ध संस्कृत प्रस्तावना लिहून पाठविली तिचें मला खरोखर किती कौतुक व आश्चर्य वाटलें हें कसें सांगू ! तुमच्या प्रस्तावनेविषयी माझी कांही आधीची अपेक्षा होतीच. तथापि तिच्याहि पलीकडे जाअून तुम्ही अुत्कृष्ट प्रस्तावना लिहिलीत. तुमची स्वभावसुंदर संस्कृतभाषापद्धति वाचली म्हणजे संस्कृत भाषेला मृतभाषा म्हणणारांचा मूर्खपणा सहज कळून येतो. ही प्रस्तावना कोणत्याहि संस्कृत साहित्यिकाला शोभेल अशीच झाली आहे. आणि ती पाहून मला वाटतें की, 'प्रस्तावना लिहिण्याची मजवर कृपा करा' अशी विनंति जेव्हा मी तुम्हांला केली, तेव्हा माझ्या मेंदूंतून अेक अकल्पित स्फूर्तीची लाट निघाली असली पाहिजे ! आणि त्याबद्दल मी स्वतःचेंच अभिनंदन करतें. तुम्ही अितकी चांगली संस्कृत भाषा लिहिलेली पाहून तुम्ही अितकें चांगलें मराठी लिहू शकतां याचें कुणालाहि आश्चर्य वाटणार नाही."

 (९९) जगांत वाङ्मय-व्यवहारांतील यश व अपयश हीं मोजण्याचें माप, सुख व दुःख हीं मोजण्याच्या माताअितकेंच अनिश्चित आहे. यांत लोकांचें व तुमचें स्वतःचें माप जुळणे कठीण. कार्यनिवृत्त होणान्या माणसा-संबंधाने त्याचे टीकाकार व प्रतिपक्षी म्हणतील 'अमका तो ना ? त्याचें जीवन अयशस्वीच झालें. कारण त्याने केलें त्याहून तो अधिक करील किंवा त्याने अधिक करावें अशी आमची तरी अपेक्षा होती. 'अुलट त्याचे