पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
६०
 

नावे दिसतात. यावरून या कुळात मातृवंशपद्धत होती असे राजवाडे म्हणतात. (राधामाधवविलासचंपू, पृ. १८० ) त्यांच्या मते मगधातून आलेल्या महाराष्ट्रिकांनी महाराष्ट्र बसविला. त्यांच्यात ही पद्धत नव्हती. यावरून सातवाहन हे. त्यांच्यात मातृवंशपद्धती असल्यामुळे, महाराष्ट्रीय नव्हत असेही राजवाडे म्हणतात डॉ. केतकरांनी गौतमीपुत्र, वसिष्ठीपुत्र इ. नावांचा आधार घेतलाच आहे. शिवाय भावाच्या घरी राहात असलेल्या एका ब्राह्मणविधवेला शेषापासून सातवाहन हा मुलगा झाला या दंतकथेचाही आधार त्यांनी घेतला आहे. शिवाय कोचीन, मलबार या प्रदेशांत स्त्री माहेरीच भावाजवळ राहाते, पती वरचेवर बदलते, पतीच्या घरी जात नाही अशी जी रुढी आहे, तिचा निर्देश केला आहे. सर्वात आश्रर्याची गोष्ट म्हणजे या दोघाही थोर पंडितांनी प्रत्यक्ष सातवाहनांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष केले आहे. पुराणे व कोरीव लेख यांच्या आधारे त्यांचा जो इतिहास दिसतो त्यावरून असे दिसते की प्रत्येक ठिकाणी पित्यामागून पुत्रच गादीवर आला आहे. चुकूनमुद्धा याउलट दिसत नाही. नागनिका, गौतमीवलश्री या स्त्रिया आपल्या पतीच्या घरीच रहात होत्या. आपले पती, पुत्र, नातू यांच्याशी असलेले नातेच त्या अभिमानाने सांगतात. पतीच्या मृत्यूनंतर तापसीव्रताने जन्मक्षेप करतात. अशा स्थितीत या घराण्यात मातृकन्यापरंपरा होती, मातृ सत्ताककुटुंबपद्धती होती, ( डॉ. केतकर, प्राचीन महाराष्ट्र भाग २ रा, पृ. ५१ ) अशी विधाने करणे युक्त नाही.
 डॉ. गोपाळाचारी यांनी आपल्या प्रबंधात विस्तृत विचार केला आहे. ते म्हणतात, सातवाहन घराण्यात ही मातेवरून निर्देश करण्याची पद्धत गौतमीपुत्रापूर्वी नव्हती. पुढे ती त्यांच्या घराण्यात दिसून येते. तशीच महारष्ट्रातील महारथी महाभोज या घराण्यातही दिसून येते. वेदकाळातील कौशिकीपुत्र, आलंबीपुत्र अशी मातृनिर्देश करणारी नावे आढळतात. बौद्धवाङमयातही वैदेहीपुत, मोगलीपुत अशी नावे ठेवण्याची पद्धत दिसते. माळव्यातल्या अनेक शिलालेखांत असा मातेवरून केलेला पुत्राचा निर्देश दिसतो. बुल्हरच्या मते आजही रजपुतांत अशी चाल आहे. कदाचित राजाला अनेक राण्या असतात, त्यामुळे पुत्राचा निर्देश करताना मातेचा निर्देश करण्याची पद्धत पडली असेल; पण त्यावरून त्या घराण्यात मातृसत्ताकपद्धती किं मातृवंशपद्धती होती असे म्हणण्याला अर्थ नाही.

शालिवाहन शक ?
 सध्या दक्षिणेत शालिवाहन शक रूढ आहे. गौतमीपुत्र सातकर्णीने तो स्थापिला असे स. आ. जोगळेकर म्हणतात. श्री. जी. बोस यांचेही तसेच मत आहे. पण हे मत टिकण्याजोगे नाही. गौतमीपुत्राने तो स्थापिला असता तर त्याच्या पुढील सातवाहनांनी तो आपल्या कोरीव लेखांत निश्चित योजिला असता. त्यांनी तर तो नाहीच योजिला, पण पुढे शकगणना ज्यांनी स्वीकारली त्यांनीही तिचा फक्त शककाल