पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७५०
 

नाही. मराठयांच्या इतिहासाविषयी ग. ह. खरे यांचे मत वर सांगितलेच आहे. तेव्हा या क्षेत्रात सामान्यतः निराशाच दिसते. इंग्रजीच्या व्यासंगाचा अभाव, पैशाची कमतरता आणि मुख्य म्हणजे सर्व आयुष्य वाहून टाकण्याची वृत्ती नाही, ही कारणे प्रामुख्याने याच्या मागे दिसतात.
 आता परकीयांचे साम्राज्य गेले. पण परप्रांतीयांचे आर्थिक साम्राज्य महाराष्ट्रावर जबरदस्त आहे. या सर्वाला वरील उणिवाच कारणीभूत आहेत असे दिसते. याचा अर्थ असा होतो की प्रारंभापासून महाराष्ट्र संस्कृतीत ज्या उणिवा दिसतात त्या अजून तशाच आहेत.
 

ब्रिटिश कालातील संशोधनाचे विवेचन झाले. आता या कालखंडातील मराठी साहित्य व मराठी कला यांचा विचार करून महाराष्ट्र संस्कृतीचा हा दीर्घ इतिहास पुरा करावयाचा आहे. पुढील तीनचार प्रकरणांचा तोच विषय आहे.