पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७३६
 

वि. वि. सोहनी, व्ही. एम. घाटगे, एस. एल. चोरघडे, व्ही. जी. भिडे, पी. बी. देव, बी. बी, देशपांडे, चंद्रशेखर अय्या, जे. डी. रानडे, एम. बी. नेवगी, पी. के. कट्टी, वाय. जी. नायक, इ.

 रसायनशास्त्र- जतकर कुळकर्णी, डी. एस. व्हीलर, जी. एस. देशमुख, डी. डी. सोळंखी, द. वा. लिमये, श्री. द. लिमये, व्ही. व्ही. असोलकर, आर. सी. शहा, आर. डी. देसाई, के. वेंकटरामन, जी. व्ही. जाधव, जी. बी. कोल्हटकर, पी. एम. बर्वे, एन. एन. गोडबोले, बी. डी. टिळक, जे. जी. काणे, डी. व्ही. ताह्मणे, के. ए. ठकार, सी. आर. तळपदे, जी. एम. नायर, इ.

 वनस्पतिशास्त्र- शं. पु. आघारकर, शं. ल. आजरेकर, एस. बी. काजळे, आर. एस. इनामदार, टी. जी. येवलेकर, बी. एन. मुळे, इ.

 प्राणिशास्त्र- द. ल. दीक्षित, टी. जी. येवलेकर, पी. आर. आवटी, कृ. र. करंदीकर, डी. व्ही. बाळ, सी. व्ही. कुळकर्णी, जी. डी. भालेराव, एन. बी. इनामदार, इ

 वैद्यक व जीवन रसायन- रणछोडदास कीर्तीकर, गज्जर, वा. रा. कोकटनूर, व्ही. आर. खानोलकर, आर. सी. चित्रे, एन. व्ही. जोशी, जी. एस. पेंडसे, इ.

 भूगर्भशास्त्र- के. पी. रोडे, क. वा. केळकर, बी. जी. देशपांडे इ.

 कृषिशास्त्र- द. ल. सहस्रबुद्धे, एस. जी. कानिटकर, पां. स. खानखोजे, एच. मॅन, जी. एस. चीमा, उ. के. कानिटकर, इ.

 स्थापत्य- निळकंठराव चावरे, जी. डी. जोगळेकर, न. स. जोशी, श्री. भि. घोटणकर.
 ही नुमती नावांची यादी दिली आहे. तीवरून फारसा काही बोध होण्याजोगा नाही. त्यांच्या कार्याचे सविस्तर वर्णन उपलब्ध झाले असते तर बरे झाले असते. पण तसे नाही. तेव्हा यातून ज्याची नावे विशेष गाजली त्यांची थोडी सविस्तरे माहिती, 'शास्त्रज्ञांचा चारत्र कोश' या डॉ. प्र. न. जोशी यांच्या ग्रंथातून, पुढे देत आहे.
 यांतले पहिले मोठे शास्त्रज्ञ अर्थातच होमी जहांगीर भाभा हे होत. शक्तिपुंजवाद (क्वांटम थिअरी), परमाणूचा सिद्धान्त, कॉस्मिक रेडिएशन हे त्यांचे संशोधनाचे विषय होते. लंडनच्या रॉयल सोसायटीचे ते सभासद होते. भारताच्या ॲटॉमिक एनर्जी संस्थेचे ते वीस वर्षे प्रमुख होते. १९५५ साली जागतिक ॲटॉमिक एनर्जी पारषदेचे ते अध्यक्ष होते. त्यांना ॲडम्स पारितोषिक, हापकिन्स पारितोषिक, इ. पारितोषिके मिळाली होती. (१९०९-६६).